आगामी विधानसभा निवडणूक आणि रणनीतीवर आंबेडकर -ओवैसी यांच्यात “गुफ्तगू “

लोकसभा निवणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांची काल आगामी विधानसभा निवडणूक आणि रणनीतीवर दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत पुन्हा एकदा एम आय एम वंचित आघाडी यांच्या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली केली जात असली तरी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबत काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे अद्याप आलेला नसल्याने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी एमआयएमला सोबत घेऊन लढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एम आय एम शी आघाडी करून ४८ लोकसभा मतदारसंघात निवडणूका लढविल्या होत्या या आघाडीला महाराष्ट्रात एक जागा मिळाली असली तरी काँग्रेस राष्ट्रवादीला रोखण्यात वंचित बहुजन आघाडीला यश मिळाले आहे . यामध्ये प्रामुख्याने आंबेडकरी मतांचा अधिक भरणा होता . वंचित बहुजन आघाडीच्या आधी हि मते काँग्रेस राष्टवादी आघाडीला जात होती परंतु वंचित बहुजन आघडीचे ने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हि मते लोकसभेत वंचित बहुजन आघाडीकडे वळली आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आंबेडकर यांनी दावा केला होता कि , आम्ही केवळ काँग्रेसची मते खेचत नसून सेना -भाजपाकडे असलेली वंचित जाती समूहांची आणि ओबीसींची मतेही खेचत आहोत परंतु प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडीचा फटका भाजप -सेनेच्या उमेदवारांना बसला तर नाहीच पण फायदा मात्र झाला. लोकसभेला पडलेल्या ४० लाख मतांची गोळाबेरीज पाहता प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेप्रमाणेच २८८ जागा लढविण्याचा निर्धार बोलून दाखविला आहे .
दरम्यानच्या काळात त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले आहे कि , आम्हाला काहीही नको फक्त काँग्रेसने आम्ही भाजपची बी टीम आहोत का ? से सांगावं आणि त्याचे पुरावे द्यावेत. किंवा ४० लाख मतदारांची माफी मागावी . मग बघू . लोकसभेच्या वेळी त्यांची पहिली आत होती कि , काँग्रेसने संघाला घटनेच्या चौकटीत कसे अंत येईल ते सांगावं म्हणजे आम्ही त्यांची युती करू नंतर त्यांनी काँगेसकडे २० अशा जागा मागितल्या कि , काँग्रेसला ते शक्य होणार नाही. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीची त्यांच्याशी युती होऊ शकली नाही आणि जे व्हायचे होते ते झाले .
यावेळी विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससमोर आमचा दर्जा काय ते आधी सांगा असा आग्रह धरला आहे . त्यावर अद्याप काँग्रेसने काहीही टिप्पणी केली नाही . दरम्यान राज्यातील सर्वच्यासर्व २८८ जागा लढविण्याची घोषणा करून प्रकाश आंबेडकर यांनी दिल्ली गाठली आहे . दरम्यान आंबेडकर -ओवैसी यांच्यात काय चर्चा झाली याचे अधिकृत निवेदन प्राप्त झालेले नाही . यावर हे दोन्हीही नेते आपली भूमिका जाहीर करतील असा अंदाज आहे .