Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चमकी ताप: १३० बळी , सर्वोच्च न्यायालयाची उत्तर प्रदेश, बिहार सरकारला नोटीस

Spread the love

बिहारच्या मुजफ्फरपूर आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये पसरलेल्या चमकी तापाने आतापर्यंत तब्बल १३० जणांचा बळी घेतला आहे. या तापाला आळा घालण्यासाठी काय प्रयत्न केले? कोणत्या योजना राबवल्या? यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारला नोटीस जारी केली असून  सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. चमकी तापामुळे बिहारमध्ये १३० जण मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांच्या आकड्यामध्ये आणि रुग्णांच्या आकड्यामध्येही वेगाने वाढ होत आहे. ढिसाळ प्रशासन आणि सरकारच्या निष्काळजीपणामुळेच हा आजार फोफावला असून यासाठी एका वैद्यकीय आयोगाची निर्मिती करण्यात यावी अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

याचिकाकर्त्यांनी याप्रकरणी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांवर ताशेरे ओढले आहेत. चमकी तापासारख्या संसर्गजन्य आजाराला वेळीच पायाबंद घालण्यासाठी योग्य पावले न उचलल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात वैद्यकीय आयोग गठित करण्याआधी सर्वोच्च न्ययालयाने सात दिवसांत केंद्र सरकार, बिहार सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ‘मुलांच्या मृत्यूचे सत्र असंच चालू राहू शकत नाही. यासंदर्भात संबंधित सरकारांना उत्तर द्यावंच लागेल. आजाराला पायबंद घालण्यासाठी काय पावलं उचलली जात आहेत याची माहिती केंद्र आणि राज्य सरकारने सात दिवसांत द्यावी.’ असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!