Honour Killing : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून गर्भवती बहिणीची लहान भावाने केली हत्या

दुसऱ्या जातीच्या मुलासोबत कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या मोठ्या बहिणीची हत्या तिच्या छोट्या भावाने केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. हत्या करणारा आरोपी अवघ्या १७ वर्षाचा आहे. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील रावद गावात ही घटना घडली आहे. बुलबुल (वय २१) या मुलीने दुसऱ्या जातीतील कुलदीपसोबत आठ महिन्यापूर्वी लग्न केले होते. ती सहा महिन्याची गर्भवती होती. दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न केल्याने कुटुंब तिच्यावर नाराज होते. मुलीने प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, असा राग मनात धरून तिच्या छोट्या भावाने तिची हत्या केली आहे. प्रेम विवाह केल्यानंतर अन्य ठिकाणी राहिलेले हे जोडपे सहा महिन्यांतर शनिवारी गावाकडे आले होते. याची माहिती मिळताच अल्पवयीन असलेला भाऊ बहिणीच्या घरी पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत अन्य १० ते १२ जण सुद्धा होते.
दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न का केले?, यावरून त्याने बहिणीसोबत वाद घालायला सुरूवात केली. बहिणीने त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, संतापलेल्या भावाने खिशातून पिस्तुल काढून तिच्यावर गोळी झाडली. गोळीबारात जखमी झालेल्या बुलबुलला सासरच्या कुटुंबाने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरोपीने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बहिणीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Indore: A pregnant woman was allegedly murdered by her brother in Betma. Kuldeep Rajawat, victim's husband,"We got married 8 months ago & her family objected it. Today suddenly her brothers Karthik and Shubham came & shot her." #MadhyaPradesh pic.twitter.com/ZHa5DQQHnC
— ANI (@ANI) June 22, 2019