पुणे जिल्ह्यात एटीएम मधून तब्बल ३० लाखांची रोकड लंपास , चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या ४ तुकड्या

काल संगमनेर येथील एटीएम फोडून १७ लाखांची रोकड लांबविल्याची बातमी असतानाच पुण्यातील ATMमधूनही चोरटयांनी तब्बल ३० लाखांची रोकड लंपास केली आहे. पुणे जिल्ह्यातील यवत येथे शनिवारी ही घटना घडली आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, चोरट्यांचा माग घेण्यासाठी पोलिसांनी ४ तुकड्या या चोरांच्या शोधासाठी रवाना केल्या आहेत. राज्यात दिवसाढवळ्या चोरीच्या घटना या वाढताना दिसत आहेत. सांगली, नाशिक येथेही दरोडेखोरांनी भरदिवसा दरोडे टाकले होते , त्यामुळे बँकर्समध्ये चिंतेचे वातारण निर्माण झाले आहे.
Maharashtra: Miscreants fled with an ATM kiosk in Yavat of Pune district yesterday. The incident was caught on CCTV camera. Police say, "The kiosk had Rs 30 Lakh cash, the miscreants fled with it. Investigation has begun. 4 teams have been sent to separate locations." pic.twitter.com/ZSFhSlk5n0
— ANI (@ANI) June 23, 2019