Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुणे जिल्ह्यात एटीएम मधून तब्बल ३० लाखांची रोकड लंपास , चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या ४ तुकड्या

Advertisements
Advertisements
Spread the love

काल संगमनेर येथील एटीएम फोडून १७ लाखांची रोकड लांबविल्याची बातमी असतानाच पुण्यातील ATMमधूनही  चोरटयांनी  तब्बल ३० लाखांची रोकड  लंपास केली आहे. पुणे जिल्ह्यातील यवत येथे शनिवारी ही घटना घडली आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, चोरट्यांचा माग घेण्यासाठी पोलिसांनी ४ तुकड्या या चोरांच्या शोधासाठी रवाना केल्या आहेत. राज्यात दिवसाढवळ्या चोरीच्या घटना या वाढताना दिसत आहेत. सांगली, नाशिक येथेही दरोडेखोरांनी भरदिवसा दरोडे टाकले होते , त्यामुळे बँकर्समध्ये चिंतेचे वातारण निर्माण झाले आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!