Rajsthan : प्रेमवेड्या “त्या” तरुणाने आपल्या आत्महत्येचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले , लोक बघत राहिले आणि पुढे ….

प्रेमात वैफल्यग्रस्त झालेल्या २० वर्षीय युवकाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडसोबत झालेल्या किरकोळ भांडणातुन या तरुणाने थेट फेसबुक लाईव्ह स्ट्रीमिंग करत गळफास लावून आत्महत्या केली आहे. राजस्थानच्या अलवरमध्ये हि घटना घडली असून निर्मल कुमावत (२०) असे बेहरोर येथे रहाणाऱ्या या तरुणाचे नाव आहे.
या घटनेचे वृत्त असे कि , आत्महत्या करताना निर्मलने फेसबुक या सोशल मीडियावर आपल्या शेवटच्या क्षणांचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले. एक्स गर्लफ्रेंडवर असलेले आपले आतोनात प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि तिच्यासाठी मी मरणही पत्करू शकतो हे दाखविण्यासाठी निर्मलने आत्महत्या केली. सोमवारी रात्री निर्मलने मोबाईलमधून आत्महत्येचे फेसबुक लाईव्ह केले. प्रारंभी निर्मलने प्रेमात कशी फसवणूक झाली याबाबत हकीकत सांगितली. त्यानंतर त्याने गोळया खाल्ल्या आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. निर्मलने दोन तास आत्महत्येचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले.
फेसबुकवर फ्रेंड असलेल्या लोकांनी त्याच्या या आत्महत्येचे लाईव्ह स्ट्रीमिंगही पाहिले असे पोलिसांनी सांगितले. या फेसबुक लाइव्हमध्ये प्रेमात झालेल्या फसवणुकीबद्दल तो खूप वेळ बोलला. त्यानंतर आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले परंतु निर्मल आत्महत्या करत असताना त्याच्या एकाही फेसबुक फ्रेंडने पोलिसांना कळविले नाही. उलटपक्षी लोकांनी कमेंट करत दु:ख होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. बेहरोर पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले तेंव्हा निर्मलचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.