Bhandara : काळी- पिवळी नदित कोसळून अपघात, ६ महिला ठार, ९ जखमी

भरधाव वेगात असलेल्या काळीपिवळीचा (वडाप) टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली काळीपिवळी पूलावरून थेट ८० फूट नदीत कोसळली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये पाच विद्यार्थीनी व एका महिलेचा समावेश आहे. मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास लाखांदूर मार्गावरील धर्मापूरी येथील चुलबंद नदीपुलावर ही घटना घडली.
मृतांमध्ये १. गुणगुण हितेश्वर पालांदूरकर (१५) रा. गोंदिया, २. शीतल राऊत (१८) रा. सानगडी, ३. अश्विनी सुरेश राऊत रा. सानगडी, ४. शिल्पा श्रीराम कावळे (२०) रा. सासरा, ५. सुरेखा देवाजी कुंभरे (१८) रा. सानगडी आणि ६. शारदा गजानन गोटेफोटे (५५) रा. सासरा यांचा समावेश आहे.
तर जखमींमध्ये १. डिम्पल श्रीरंग कावळे (१७) रा. सासरा, २. शुभम नंदलाल पाथोडे (१८) रा. तई/बारव्हा, ३. वंदना अभिमन सतीमेश्राम (४०) रा. सासरा/कटंगधरा, ४. मालण पुरुषोत्तम टेंभूर्णे (४०) रा. खोलमारा ता. लाखांदूर, ५. रिद्धी हितेश्वर पालांदूरकर रा. गोंदिया, ६. विणा हितेश्वर पालांदूरकर (३४) रा. गोंदिया, ७. अभिमन तानबा सतीमेश्राम (४५) रा. सासरा, ८. ईमानी तारांचद हेडावू (१९) रा. सानगडी, ९. शीतल खर्डेकर रा. सानगडी यांचा समावेश आहे.