News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

वर्ल्डकप: कोणताही सामना आमच्यासाठी विशेष नसतो. प्रतिस्पर्धी कोणी असो, आम्ही प्रत्येक सामना तितक्याच जबाबदारीने खेळतो – विराट कोहली
भारत एक संतुलित संघ आहे आणि त्यांनी वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. उद्याचा सामना मोठा आहे. पण शेवटी तो एक खेळ आहे आणि मी
लोकांना आवाहन करेन की या सामन्याकडे खेळ म्हणूनच पाहा – इंझमाम उल हक, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू
कोलकाता: मी सर्व डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन करते. हजारो रुग्ण उपचारांच्या प्रतीक्षेत आहेत, राज्यात एस्मा कायदा लागू करण्याची माझी इच्छा नाही.
आम्ही कनिष्ट डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, त्यामुळे त्यांनी काम सुरू करावे- ममता बॅनर्जी
बिहार: मुझफ्फरपूरमध्ये मेंदूज्वराच्या बळींची संख्या ६९ वर पोहोचली
नाशिक: मुत्थुट फायनान्सवर दरोडा टाकणाऱ्या फरार आरोपींची वाहने आशावाडी परिसरात सापडली
यवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.