Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

इंटर्नशिप साठी भारतात आलेल्या विदेशी महिलेवर अत्याचार

Advertisements
Advertisements
Spread the love

हरयाणातल्या गुरूग्राम या ठिकाणी शुक्रवारी रात्री एका स्पॅनिश महिलेवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातल्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्याने आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार  स्पॅनिश महिलेने केली आहे. पीडित तरूणी ही वर्षभराच्या इंटर्नशीपसाठी आली आहे. गुरूग्राम येथील एका आयटी कंपनीही ही युवती इंटर्नशीप करते आहे.  पोलिसांनी या प्रकरणी नराधमाला अटक केली आहे.

Advertisements

या सगळ्या प्रकराबाबत अटक करण्यात आलेल्या नराधमाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी डीएलएफ फेज १ च्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पीडित युवती एका पार्टीसाठी गेली होती. त्यानंतर एका प्रॉडक्शन हाऊसच्या असिस्टंट मॅनेजरने माझ्यावर बलात्कार केला असे या पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!