News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या …

मुंबईः दादर येथील चैत्यभूमीत अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य शासनाची मंजुरी
दिल्लीः निवृत्त आयएस अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रिन्सिपल सचिव म्हणून नियुक्ती
पुणेः वृद्ध घरमालकाला जेवणातून गुंगीचे औषध देऊन बंगल्यात घरकाम करणाऱ्या नेपाळी दाम्पत्याने लाखोंचे दागिने केले लंपास
पुणेः रस्त्याच्या अपघातात गंभीर जखमी होऊन ब्रेनडेड झालेल्या कोल्हापूरमधील दहावी उत्तीर्ण झालेल्या एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने अयववदान केल्याने चौघांना जीवदान
अहमदनगरः शिर्डी येथे अज्ञात व्यक्तीकडून एका तरुणाची गोळी झाडून हत्या
औरंगाबाद: पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा पती अनिल अण्णा जाधव, सासरा अण्णा जाधव व सासू शेभाबाई जाधव यांना पाच वर्षे सक्तमजुरी व ११ हजार रुपये दंडाची शिक्षा
भोपाळ – विदिशा येथील गावाजवळ बसला अपघात, 3 ठार 7 जखमी
राज्यसभेच्या नेतेपदी थावरचंद गेहलोत यांची निवड
यवतमाळ- शारी येथे वीज पडून तरुणी ठार
वाशिम- साडेपाच हजाराची लाच स्वीकारताना सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जेरबंद
अमरावती (आंध्र प्रदेश) – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल गौडा यांनी घेतली आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची भेट
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 13 जून रोजी ब्लॉक, दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबई लेनवर कामशेतजवळ ओव्हरहेड गँट्री बसवण्यासाठी वाहतूक दोन तास रोखली जाणार.
राजीव रंजन सिंह यांची जदयूकडून संसदीय गटनेतेपदी निवड
मुंबई – सायन कोळीवाडा येथे नववीत शिकणाऱ्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या