Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबईत शेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Advertisements
Advertisements
Spread the love

दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कफ परेड भागात एका १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलाकाराची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. १० जून या दिवशी ही घटना घडली असून पीडित अल्पवयीन मुलीवर एकून ३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे तिघे पीडित मुलीचे शेजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisements

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर शेजाऱ्याची अनेक दिवसांपासून नजर होती. पीडित मुलगी घराबाहेरल कचरा फेकण्यासाठी गेली असताना तिच्या शेजाऱ्याने तिला आपल्या घरी बोलावले. घरात या शेजाऱ्याचे आणखी दोन मित्रही उपस्थित होते. पीडित मुलगी घरात आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. त्या नंतर हे तिघेही पळून गेले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!