Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक , झाले पूर्ववत , वादग्रस्त पोस्ट केल्या डिलीट

Spread the love

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. ‘अय्यिलदीझ तिम’ या तुर्कीश हॅकर्सच्या संघटनेने बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले असून मुंबई पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली आहे. सोमवारी रात्री उशिरा अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले असल्याचे वृत्त आहे . हॅकर्सनी सर्वप्रथम त्यांच्या अकाउंटचा प्रोफाइल फोटो बदलून तिथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा प्रोफाइल फोटो लावला. त्यानंतर अय्यिलदीझ तिम या संघटनेने आइसलॅंडने तुर्कस्तानच्या फुटबॉलपटूंना दिलेल्या वागणूकीचा निषेध केला. तसंंच अमिताभ बच्चनच्या ट्विटर अकाउंटवर आपण सायबर हल्ला केला असल्याची माहिती देणारं ट्विटही त्यांनी केलं. या ट्विटनंतर पाकिस्तानला पाठिंबा देणारे आणि भारताचा निषेध करणारे काही ट्विटही या अकाउंटमार्फत करण्यात आले.

दरम्यान सदर अकाउंट आता पुन्हा हस्तगत करण्यात आले असून वादग्रस्त पोस्ट डिलीट करण्यात येत आहेत . यापूर्वी शाहिद कपूर याचेही अकाउंट हॅक करण्यात आले होते.

दरम्यान बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनीही लगेच महाराष्ट्र सायबर सेलला या प्रकाराची माहिती दिली. सायबर सेल याप्रकरणी पुढील तपास करत असून लवकरच हे अकाउंट पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांत भारत सरकारच्या काही मंत्रालयांच्या वेबसाइट्स हॅक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. भाजप, काँग्रेसच्या वेबसाइटही हॅक झाल्या होत्या. आता मात्र अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंटच हॅक झाल्यामुळे समाज माध्यमांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित झालं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!