Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पायल तडवी आत्महत्या: आरोपींच्या कोठडीत कोर्टाने वाढ केली आणि आरोपी ढसा ढसा रडू लागल्या …

Spread the love

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही महिला डॉक्टर आरोपींची न्यायालयीन कोठडी २१ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी १७ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
नियमित सुनावणीसाठी या खटल्यातील एक वकील उपलब्ध नसल्याने न्यायालयाने आरोपींची कोठडी वाढवली आहे. कोर्टात सुनावणीनंतर डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिन्ही महिला डॉक्टर अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या. ‘जेलसारख्या भयानक ठिकाणी आम्ही नाही राहू शकत. आम्हाला सोडा,’ असं आर्जव त्या करत होत्या.

डॉपायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिनही संशयित आरोपी डॉक्टरांना आज कोर्टात हजर करण्यात आले होतेसुनावणी दरम्यान कोर्टाने गुन्हे शाखेला जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले होतेत्यामुळे या प्रकरणाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब करण्यात आली होतीया प्रकरणी त्यांना आज कोर्टात दाखल केलेदरम्यानया तिनही संशयित आरोपी डॉक्टरांनी कोर्टात एकच हंगामा केलाकोर्टात आरडाओरड करत तडवी आत्महत्या प्रकरणी तिनही आरोपींनी कोर्टात रडारड करत आम्हाला पोलिसांनी त्रास दिल्याची तक्रार कोर्टासमोर मांडलीतसेच या प्रकरणाची पुढील न्यायालयीन कोठडीची सुनावणी २१ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

तडवी आत्महत्या प्रकरणातील तिनही संशयित आरोपी यांना पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आल्याची तक्रार या संशयित डॉक्टरांनी केली आहे. याप्रकरणी कोर्टाने १७ जूनपर्यंत व्हिडिओ रोकोर्डिंगची व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

डॉ. पायल तडवी या नायर हॉस्पिटलमध्ये पीजीच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या. हॉस्पिटलच्याच आवारातील वसतीगृहात त्या राहत होत्या. पण, तिथे पहिल्या दिवसापासून डॉ. आहुजा, डॉ. मेहेर आणि डॉ. खंडेलवाल यांनी जातीवरुन डॉ. पायलला त्रास देण्यात सुरूवात केली, अशी तक्रार डॉ. पायल यांच्या आईने केली आहे. याबाबत पायल यांनी हॉस्पिटलचे अधिष्ठाते, वसतीगृहाच्या वॉर्डन आणि व्याख्याते यांच्याकडे तक्रार केली होती. पण, तरीही छळ न थांबल्याने त्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बुधवारी डॉ. पायलने वसतीगृहातील राहत्या घरात गळफास घेऊन डॉ. पायल यांनी आत्महत्या केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!