Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Dubai Bus Accident : दुबईत झालेल्या भीषण बस अपघातात ८ भारतीयांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

दुबईत झालेल्या भीषण बस अपघातात १७ लोक ठार झाले असून मृतांमध्ये ८ भारतीयांचा समावेश आहे. बस चालक अल रशिदिया याने बससाठी प्रतिबंधित असलेल्या रस्त्यावरून बस नेल्यानंतर ही दुर्घटना झाल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत ९ जण गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे.दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या अपघातात ८ भारतीयांचा मृत्यूझाल्याची माहिती दूतावासाने ट्विटद्वारे दिली आहे. गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या बसमध्ये एकूण ३१ पर्यटक प्रवास करत होते. ही बस एका बॅरियरला धडकली. बसच्या डाव्याबाजूचा भाग बॅरियरला धडकल्याने बसमध्ये डाव्या बाजूला बसलेल्या लोकांचा मृत्यू झाला.

Advertisements

दुबईतील वाणिज्य दूताने अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. शिवाय हॉस्पिटल आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत सर्वप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले.

Advertisements
Advertisements

बस अपघातात मृत्यू पावलेल्या भारतीयांची नावे

१. राजगोपालन
२. फिरोज खान पठान
३. रेशमा फिरोज खान पठान
४. दीपक कुमार
५. जमालुद्दीन अरक्कावेतील
६. किरण जॉनी
७. वासुदेव
८. तिलकराम जवाहर ठाकूर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!