Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NEET परीक्षेचे निकाल जाहीर; महाराष्ट्राचा सार्थक देशात सहावा तर राज्यात सर्वप्रथम

Spread the love

आज बुधवारी NEET -2019 परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले असून  यामध्ये राजस्थानच्या नलिन खंडेलवालने टॉप करत देशात पहिला येण्याचा मान मिळवला. त्याने 720 मधून 701 गुणांची कमाई केली. तर दिल्लीच्या भाविक बंसलने दुसरा, तर उत्तर प्रदेशच्या अक्षत कौशिकने तिसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या सार्थक भट याने 720 पैकी 695 गुणांची कमाई करत देशात सहावा येण्याचा मान मिळवला. तर मुलींमध्ये माधुरी रेड्डी हिने टॉप केले असून तिचा ऑल इंडिया रॅक सातवा आहे. माधुरी रेड्डी हिने 720 मधून 695 गुणांची कमाई केली आहे. दरम्यान, पहिल्या 100 जणांमध्ये 20 मुलींचाही समावेश आहे. दिव्यांग श्रेणीमध्ये उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशच्या सभ्यता सिंग कुशवाला हिने टॉप केले. तिने 610 गुण मिळवत दिव्यांग श्रेणीतून पहिले येण्याचा मान मिळवला. दरम्यान, नीटचा सर्व्हर डाऊन झाला असून विद्यार्थ्यांना आपले निकाल पाहण्यात

NEET -2019 या परिक्षेसाठी 15,19,375 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 7,97,042 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. 5 मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. परंतु फॅनी वादळाच्या तडाख्यामुळे कर्नाटकातील विद्यार्थ्यांसाठी 20 मे रोजी पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांना आपले निकाल ntaneet.nic.in किंवा nta.ac.in. वर पाहता येतील.

निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुणांच्या आधारावर कौन्सिलिंग आणि अंडरग्रेजुएट मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन होणार आहे. NEET 2019 Result जारी झाल्यानंतर मेडिकल कौन्सिलिंग कमिटी एमसीसीच्या होमपेजवर नीट कौन्सिलिंग 2019 ची यादी जाहीर करण्यात येणार आहे.  दरम्यान, नीटचा सर्व्हर डाऊन झाला असून विद्यार्थ्यांना आपले निकाल पाहण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे.

टॉप १० ची यादी

01 – नलिन खंडेलवाल – 701 – राजस्थान
02 – भाविक बंसल – 700 – दिल्ली
03 – अक्षत कौशिक – 700 – उत्तर प्रदेश
04 – स्वास्तिक भाटिया – 696 – हरियाणा
05 – अनंत जैन – 695 – उत्तर प्रदेश
06 – सार्थक भट – 695 – महाराष्ट्र
07 – माधुरी रेड्डी जी – 695 – तेलंगण
08 – ध्रुव कुशवाहा – 695 – उत्तर प्रदेश
09 – मिहिर राय – 695 – दिल्ली
10 – राघव दुबे – 691 – मध्य प्रदेश

आपलं सरकार

Click to listen highlighted text!