News Updates : दिवसभरातील बातम्या , एक नजर

1. गर्भलिंग कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी डॉ. राजेंद्र पांडेला २० हजाराच्या दंडासह दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. डॉ. पांडे याने गर्भलिंग कायद्याचं उल्लंघन केल्याचं आढळून आल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक न्यायालयात २०१४ पासून त्यावर सुनावणी सुरू होती. याप्रकरणी पांडे दोषी आढळल्याने न्यायालायाने त्याला दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. अधिनयम १९९४ तरतूदीनुसार गर्भलिंग निदान करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
2. पुणेः दहावीचा निकाल ८ जूनला जाहीर होणार.
3. जळगाव : कर्जामुळे हताश झालेल्या युवराज महादू चव्हाण या शेतक-याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन केली आत्महत्या .
4. वर्ल्डकपः पाकिस्तानचे इंग्लंडसमोर विजयासाठी ३४९ धावांचे आव्हान
5. औरंगाबादः रस्त्यांची कामे फारच धीम्यागतीने सुरू असल्यामुळे महापालिका आयुक्तांनी चार कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली
6. औरंगाबाद: कुलगुरू चोपडे यांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न, आंदोलक ताब्यात
7. औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी. डॉ. देवानंद शिंदे
8. पुणेः विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत मुलींच्या हातात तलवारी आणि एअरगन प्रकरणी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हा मंत्री यांना अटक करण्यासाठी पथक रवाना, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची माहिती
9. मुंबई विशेष कोर्टाने इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक विरुद्ध आरोपत्र स्वीकारले. १९ जून रोजी होणार सुनावणी.
10. बीडः मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न साकार करूः मुख्यमंत्री.