काश्मिरात दोन वेगवेगळ्या चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मिरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला. पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये दोन तर शोपियान जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं पुलवामातील त्राल येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना दुपारी मिळाली होती. यानंतर कारवाई करत सुरक्षा दलांनी या भागात शोध मोहीम राबवली. या शोध मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं. ही चकमक जवळपास तीन चालली. या चकमकीत दोन दशतवादी ठार झाले. पुलवामाशिवाय दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. शोपियानमधील दारगाड सुगन भागात चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. यानंतर त्यांच्या स्थानिक सहकाऱ्याचाही खात्मा केला. त्यांच्याकडील साहित्य आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.