आधुनिक बिरबलाच्या लग्नाची अनोखी कथा !! दोन वधू आणि एक वर ….

Advertisements
Advertisements
Spread the love

हि अनोखी कथा आहे छत्तीसगडच्या दांतेवाडातील मुचणार गावातील बिरबल , प्रतिभा आणि सुमनींची.  कथा अशी आहे कि , येथील बीरबल नाग नावाच्या व्यक्तीचं प्रतिभा नावाच्या मुलीबरोबर लग्न होतं. लग्नाला सुरूवात होताच बीरबलची प्रेयसी सुमनी मांडवात पोहचली. सुमनी आणि बिरबल यांचं एकमेकांवर अतोनात प्रेम. लग्नामध्ये अचानक गर्लफ्रेंड पोहचल्यावर हाणामारी, गोंधळ, भांडणं होतातच. मात्र, गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी समजुतदारपणे हे प्रकरण सोडवलं. त्यांनी बिरबल, प्रतिभा आणि सुमनी या तिघांचं लग्न लावून दिलं.

Advertisements

स्थानिक प्रसारमाध्यांच्या वृत्तानुसार, दोन वर्षांपूर्वी बिरबल आणि सुमनीच्या प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध होता. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण घरातील विरोधामुळे झालं नाही. दोन वर्षानंतर बिरबल प्रतिभाशी लग्न करण्यास तयार झाला. दोघांचे लग्न होणार म्हणताच तिथे सुमनीची एन्ट्री झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं. पोलीस स्टेशनमध्ये नवरी, नवरदेव , प्रेयसी आणि नवरदेवाच्या कुटुंबियामध्ये चर्चा झाली. त्यावेळी प्रतिभा आणि सुमनने एक पती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. याला समाजाच्या प्रमुखांनी देखील विरोध दर्शवला नाही. त्यानंतर त्यांचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात लावून देण्यात आलं. आधुनिक बिरबलाच्या लग्नाच्या या अनोख्या कथेची वार्ता सर्वदूर गेली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!