…आणि नरेंद्र मोदी झाला मोहम्मद अल्ताफ आलम मोदी !!

Advertisements
Advertisements
Spread the love

उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये एका मुस्लीम कुटुंबाने त्यांच्या घरात जन्मलेल्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठवल्याचे वृत्त चांगलेच व्हायरल झाले होते . या वृत्तात म्हटले होते कि , नरेंद्र मोदींबद्दलच्या प्रेमापोटी त्यांनी पंतप्रधानांच्या नावावरुन मुलाचे नामकरण केले होते. मात्र सामाजिक दबावामुळे त्यांनी आता या कुटुंबाने मुलाचे नाव बदलून मोहम्मद अल्ताफ आलम मोदी ठेवले आहे.  मुलाच्या आईने त्याचा जन्म २३ मे रोजी लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी झाल्याचे सांगितले होते. मात्र स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर मुलाचा जन्म १२ मे रोजी झाल्याचे सांगितले. लोकप्रियता मिळवण्यासाठी मुलाच्या आईने जन्मतारीख बदलून २३ मे केली असा आरोपही रुग्णालयाने केला.

Advertisements

मुलाचे नाव बदलण्यासाठी या कुटुंबावर सामाजिक दबाव येत होता. मुलाच्या जन्मानंतर विधी करण्यात आले. त्यामध्ये नावावर आक्षेप असल्यामुळे काही कुटुंबियांनी सहभागी होण्यास नकार दिला असे मुलाची आई मेहनाज बेगम यांनी सांगितले. वाद आणखी वाढवायचा नसल्यामुळे  आम्ही नाव बदलण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या नावामध्ये अजूनही मोदी आहे असे आईने सांगितले. हे कुटुंब मोदींचे समर्थक आहे. माझ्या सूनेने देशाच्या पंतप्रधानांच्या नावावरुन मुलाचे नाव ठेवले त्याचा मला अभिमान आहे असे आजोबा सुरुवातीला म्हणाले होते.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!