News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

1. औरंगाबादः किरण चव्हाण या बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, मुकुंदवाडी परिसरात दुपारी दोन वाजता घडली घटना
2. औरंगाबादः कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी मराठवाडा लॉ कृती समितीचे मुंबईत उपोषण, अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे विरोधी
पक्षनेते धनंजय मुंडे यांचे आश्वासन
3. औरंगाबाद: डॉक्टर पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची एसएफआयची मागणी, विद्यार्थ्यांनी घेतली विद्यापीठात शोकसभा
4. हैदराबादः राजीव गांधी विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून ११.१ किलो सोने जप्त, सोन्याची किंमत ३ कोटी, ६३ लाख ५२ हजार ५०० रुपये. दीड कोटींचे विदेशी चलनही जप्त
5. कोल्हापूरः कागल येथे पुणे-बेंगळुरू महामार्गानजिक सर्व्हिस रोडवर जिपची दुचाकीला धडक, अपघातात एक ठार, दोघे जखमी. विजय गणेश पाटील (वय ४६) यांचा अपघातात मृत्यू
6. औरंगाबादः कामे न ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांचा स्थायी समितीच्या बैठकीत इशारा
7. औरंगाबाद: महापालिकेच्या अग्निशमन विभागाची शहरातील ४१ कोचिंग क्लासेसना नोटीस, फायर एनओसीच्या संदर्भात खुलासा करण्याची सचूना
8. मुंबईतील डॉक्टर पायल तडवी रॅगिंग आणि आत्महत्येप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांना नोटीस
9. औरंगाबादः अपूर्ण पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अंजनडोह (ता. औरंगाबाद) येथील महिला व नागरिकांचे आज जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
10. नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली प्रणव मुखर्जी यांची भेट.
11. मुंबईः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन घेतली भेट.
12. मुंबईः डॉ. पायल तडवी हिच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज नायर हॉस्पिटलबाहेर आंदोलन केले.
13. नागपूरः हिंगणा मार्गावरील बालाजी नगर पेट्रोल पंपसमोर धावत्या बसला आग. आगीत बस जळून खाक.
14. नवी दिल्ली – एनआयएचे दोन अधिकारी श्रीलंकेला रवाना, इसिस कनेक्शनच्या प्रकरणात करणार चौकशी
15. अकोला : बारावीत कमी गुण मिळाल्यानं अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील विद्यार्थिनीची आत्महत्या