औरंगाबादेत महापालिकेचे अभियंता मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल , अधिकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा श्री हेमंत कोल्हे व उपअभियंता श्री फलक हे एन ५ येथील पाणी टाकीवरती पाण्याचे नियोजन करत असताना एन ४ येथील काही नागरिक तेथे आले व त्यांनी पाणी आले नसल्या कारणाने संबंधित अधिकारी यांच्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व श्री फालक यांना मारहाण केली या घटनेची दखल घेऊन शनिवारी मा आयुक्त महोदय यांनी सिडको पोलीस स्टेशन एन ७ येथे एन सी बाबत गुन्हा दाखल केला .
रविवारी याचे पडसाद उमटले व सोमवार दिनांक २७ मे रोजी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेचे श्री संजय पवार , एस डी पानझडे,श्री रवींद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली मनपा मुख्यालय येथे सकाळी १० वाजता सर्व अधिकारी ,कर्मचारी यांची निषेध सभा घेऊन निषेध नोंदवला.व काम बंद चा इशारा दिला . यासंबंधी संघटनेचे शिष्टमंडळाने मा आयुक्त डॉ निपुण विनायक यांची भेट घेतली. मा आयुक्त महोदयांनी शिष्ठमंडळाला धीर देऊन त्यांची बाजू घेतली व मा पोलीस आयुक्त यांना फोन करून संबधिता वरती कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती केली.तसेच शिष्ठमंडळाने मा महापौर श्री नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन सर्व प्रकाराची माहिती दिली मा महापौरांनी यावेळी सर्व अधिकाऱ्यांची प्रशंसा केली व या घटनेचा निषेध केला.
मा पोलीस आयुक्तांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सायंकाळी ५ वाजता भेटी ची वेळ दिली .मा पोलीस उपायुक्त श्रीमती दीपाली घाडगे यांच्याशी संबंधित शिष्टमंडळाने चर्चा केली यावेळी मा उपयुक्तांनी वरिष्ठ अधिकारी यांना याबाबत सूचना केल्या. त्याप्रमाणे संघटनेचे पदाधिकारी एन 7 पोलीस स्टेशन येथे गेले असता संबधित पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण करणाऱ्या व शिवीगाळ करणाऱ्या सबधितांवर्ती कलम ३५३ अंतर्गत शासकीय कामात अडथळा आणणे याकरिता गुन्हा दाखल केला.
या निषेध सभेच्या वेळी मा शहरअभियंता श्री एस डी पानझडे, मा मुख्यलेखाधिकारी श्री संजय पवार, मा उपायुक्त तथा अतिक्रमन विभाग प्रमुख श्री रवींद्र निकम, मा सहायक आयुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख श्री नंदकिशोर भोंबे ,मा सहायक आयुक्त श्री करणं कुमार चव्हाण,श्री विक्रम दराडे,मा विधी सल्लागार श्रीमती अपर्णा थेटे, मा नगरसचिव श्री सूर्यवंशी, मा कार्यकारी अभियंता श्री एम बी काझी, श्री ए बी देशमुख, मा वार्ड अधिकारी श्री पैठणे ,श्री अजमत खान ,श्री ज्ञाते,श्रीमती मीरा चव्हाण, मा उद्यान अधीक्षक श्री विजय पाटील,मा मुख्यलेखा परीक्षक श्रीमती दिपराणी देवतराज,श्री कोंबडे,श्री बाळासाहेब शिरसाठ, श्री सय्यद जमशेद,अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.