Gujrat Gauwrav : ऐतिहासिक विजयानंतर मोदींचे गुजरातमध्ये जंगी स्वागत , मोदी म्हणाले आता विनम्रता महत्वाची !!

#WATCH People turn on flash lights of their mobile phones after Prime Minister Modi concludes his address in Ahmedabad. pic.twitter.com/p8drFCM6pn
— ANI (@ANI) May 26, 2019
देशातील जनतेकडून सर्वात मोठा कौल घेतल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘होमग्राऊंड’वर अहमदाबादमध्ये आले आहेत. त्यांचे तेथे जंगी स्वागत करण्यात आले. ‘मोठा जनादेश मोठ्या जबाबदाऱ्या घेऊन येतो. इतका मोठा विजय पाहता विनम्र राहणं महत्त्वाचं आहे,’ असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
दरम्यान, अहमदाबाद मध्ये आपल्या भाषणाला सुरुवात करण्याआधी मोदींनी सूरतमध्ये अग्नितांडवात बळी गेलेल्या विद्यार्थ्यांबाबत दु:ख व्यक्त केले. या घटनेसंदर्भात आपण सतत राज्याच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांची स्वप्न बेचिराख झाली. जेवढं दु:ख व्यक्त केलं जाईल तितकं कमीच आहे, अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला. सूरत दुर्घटनेमुळे कोणतीही मोठी विजयी मिरवणूक काढायची नाही, असा निर्णय भाजपने घेतला.
‘सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर मी म्हणालो होतो की ३०० हून अधिक जागा भाजपला मिळतील. मी म्हटलं तेव्हा लोकांनी चेष्टा केली. आता निकाल सर्वांसमोर आला. इतका मोठा जनादेश ऐतिहासिक आहे. लोकांनी ठरवलं की त्यांना एक मजबूत सरकार हवं आहे. निवडणूक प्रचाराच्या पहिल्या तीन दिवसांतच माझी खात्री पटली की ही निवडणूक भाजप किंवा एनडीए लढत नाही, देशाची जनता निवडणूक लढत आहे,’ अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदींचं भाषण संपल्यानंतर नागरिकांनी मोबाइलचे फ्लॅश लाइट सुरू करत मोदींना अभिवादन केले.