News Updates : गल्ली ते दिल्ली , दिवसभरातील महत्वाच्या बातम्या , एक नजर

१. गोरक्षणाच्या नावाने मुस्लिमांना होणारी मारहाण आणि त्यांच्या हत्या रोखाव्या, एमआयएमचे खासदार ओवैसींची मागणी
२. छत्तीसगडः हिरोली जंगलात सुरक्षा दलाच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार, ठार नक्षलवादी भाजप आमदार भीमा मांडवी यांच्या हत्येतील आरोपी, दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांची माहिती
३. नरेंद्र मोदींचा ३० मे रोजी राष्ट्रपती भवनात होणार शपथविधी, संध्याकाळी ७ वाजता होणार शपथविधी सोहळा
४. अहमदाबादः पंतप्रधान मोदींचं भाषण संपल्यानंतर नागरिकांनी मोबाइलचे फ्लॅश लाइट सुरू करत मोदींना अभिवादन केले
५. मुंबईः ५६ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा; वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब येथे प्रारंभ
६. नाशिक: विल्लोळीजवळील खत प्रकल्पासमोर ट्रक व कारचा भीषण अपघात; चालकासह तीन जण जखमी
७. सांगली: राम रहीम कॉलनीत पांडुरंग तुकाराम गलांडे या व्यक्तीची गुंडाकडून निर्घृण हत्या
८. अहमदाबाद विमानतळाजवळ असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली
९. शारदा चिट फंड घोटाळ्या प्रकरणी सीबीआयची कोलकाताचे माजी आयुक्त राजीवकुमार यांच्याविरोधात लुक आउट नोटीस, सर्व विमानतळांना सतर्कतेच्या सूचना
१०. अहमदनगर: नगर-मनमाड महामार्गावर राहुरीजवळ बोलेरो जीप आणि ट्रकचा अपघात, तीन ठार तर नऊ जखमी
११. पंढरपूरः साखरपुड्यासाठी पंढरपूरवरून अहमदनगरकडे निघालेली खासगी प्रवासी बस गुरसाळेजवळ पलटी, अपघातात ३० जण जखमी
१२. पुणे: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी कोर्टाच्या आवारात हजर
१२. अमेठी: भाजप कार्यकर्ते सुरेंद्र सिंह यांची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट; गुन्हेगारांचा शोध सुरु
१३. राज्यात काँग्रेस पक्षात कोणते फेरबदल करायचे याचा संपूर्णपणे निर्णय राहुल गांधी घेतील, अशोक चव्हाण यांनी केलं स्पष्ट; लवकरच राहुल यांची भेट घेणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.