Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जातीवरून कायम अपमान केल्याने नायर मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची आत्महत्या, मृतदेह नेला जिल्हाधिकारी कार्यालयात

Spread the love

मुंबईच्या नायर मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या जळगावच्या  पायल तडवी , २३ या विद्यार्थिनीनं रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन वरिष्ठ विद्यार्थिनीं जातीवरून बोलत असल्यामुळे पायलने आत्महत्या  केल्याचा आरोप तिच्या नाताईवाईकांनी केला आहे.  दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. त्यावेळी संतप्त नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पायलच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर हॉस्पिटलमधील तीन महिला डॉक्टरांवर आयपीसी कलम 306 (आत्महत्येला भाग पाडणे) , रॅगिंग विरोधी व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तसेच अनुसूचित जातीवर आक्षेपार्ह्य विधान केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटी देखील दाखल करण्यात आली आहे.

नायर हॉस्पिटलच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पायल ही मूळ जळगावची विद्यार्थिनी गायनॅकोलॉजि विषयातील दुसऱ्या वर्षाचे पदव्युत्तर शिक्षण घेत होती.तर पायल चे पती सलीम तडवी हे कूपर हॉस्पिटलमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. गेल्या वर्षभरापासून तीन महिला डॉक्टर पायलचा छळ करीत होत्या , या डॉक्टर आपण मागास जातीचे आहोत म्हणून खाण्यापिण्यावर, पतीला भेटण्यावर बंधन घालायच्या तसेच आपण पदवी शिक्षण पूर्ण करू नये अशी धमकी द्यायच्या असे पायलने आई वडील व पतीला सांगितले होते.

यासंदर्भात हॉस्पिटलच्या  अन्य तीन  डॉक्टरांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायल या 26 वर्षीय पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या तरुणीला याच हॉस्पिटल मधील अन्य तीन महिला डॉक्टरांकडून तिच्या जाती वरून वारंवार बोलणी ऐकावी लागत होती. या त्रासाला कंटाळून पायलने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असणार असा आरोप पायलच्या कुटुंबाकडून करण्यात आला होता . यानंतर आग्रीपाडा पोलिसांच्या तपासात डॉ. हेमा अहुजा, डॉ.भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडिलवाल या तीन महिला डॉक्टर व्हाटसप चॅटवरून पायलचे रॅगिंग करत असल्याचे समोर आले आहे.

पायलच्या आई आबिदा यांनी म्हटले आहे कि , ‘मी जेव्हा रुग्णालयात आले त्यावेळी तीन डॉक्टर महिलांनी पायलला भेटू दिलं नाही. बुधवारी तिनं मला फोन केला आणि रडायला लागली. तीन वरिष्ठ डॉक्टरांकडून माझा मानसिक छळ होत आहे असं ती सांगत होती.’ पायलच्या नातेवाईकांनी सांगितलं की, ‘पायलच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील संवादाचे पुरावे आम्ही पोलिसांकडे दिले आहेत. तीन वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून तिचा सातत्यानं जातीवरून अपमान केला जात असे.’ दरम्यान नायर रुग्णालयाच्या व्यवस्थापन विभागातील वरिष्ठांनी  सांगितले कि , या घटनेबाबत ऐकून धक्का बसला. पायलने  याबाबत शिक्षक किंवा रॅगिंगविरोधी समितीकडे कोणतीही तक्रार केली नाही. आम्ही हे प्रकरण पोलिसांकडे सोपवलं असून रॅगिंगविरोधी समिती या प्रकरणी तपास करणार आहे.

बुधवारी संध्याकाळी तिने आपल्या रुममध्येच फास लावून घेतला, याबाबत माहिती मिळताच पोलिसांना बोलवण्यात आले, प्राथमिक तपासात पायलचा मृत्यू अपघाती आहे असे नोंदवण्यात आले होते मात्र पायलच्या कुटुंबीयांनी यांसाठी हॉस्पिटलमधील तीन डॉक्टरांना दोषी धरले आहे, डॉक्टरांच्या व्हाट्सअप ग्रुपवर पायलला या तीन डॉक्टर सतत अपमानित करायच्या. याचे स्क्रीनशॉट कुटुंबीयांनी पोलिसांना दिले. तसेच तिच्या आईने जळगाव पोलिस अधीक्षकांकडे दहा मे रोजी एक अर्ज दिला होता.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!