News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

१. लोकसभेच्या ५४२ जागांसाठी मतदान झाले, निवडणूक आयोगाची माहिती
२. मध्य प्रदेशात इंदूरमध्ये 37 अंध महिला मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
३. औरंगाबादः काँग्रेस गटनेता निवडीसाठी सोमवारी मुंबईत काँग्रेस आमदारांची बैठक
४. अहमदनगर: डॉ. अशोक विखे यांचे उद्यापासून लोणी येथे होणारे उपोषण तूर्त स्थगित, आचारसंहिता संपल्यानंतर २७ मे नंतर करणार उपोषण, जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याने उपोषण स्थगित ठेवल्याची विखे यांची माहिती
५. दिल्लीः यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांची आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भेट घेतली
६. साताराः खंबाटकी घाटात कार आणि ट्रकच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
७. औरंगाबाद : चिकलठाणा एम आय डी सीतील प्रीमियम कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग.
८. नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला
९. केदारनाथ यात्राः मोदींकडून अचारसंहितेचा भंग; तृणमूल काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
१०.गडचिरोलीत नक्षलवादी पुन्हा सक्रिय; वखारीतील ट्रक पेटवला
११. कोल्हापूर: हातकणंगले-वडगाव रोडवर दोन ट्रकच्या अपघातात १ ठार, ९ जखमी
१२. बिहार: साध्वीचं वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची हा भाजप अंतर्गत प्रश्न आहे, पण आपण अशा तऱ्हेची वक्तव्ये सहन करू शकत नाही- मुख्यमंत्री नितीश कुमार
१३. उत्तराखंडः केदारनाथचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे. – पंतप्रधान मोदी
धुळे : साक्रीचे आमदार डी एस अहिरे यांच्या वाहनाने साक्री पिंपळनेर रस्त्यावर शेणपूर फाट्याजवळ दोन जणांना उडवले. दोघे जागीच ठार