Loksabha 2019 : अंतिम टप्प्यासाठी ६०.२१ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज झालेल्या मतदानात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६०.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. या टप्प्यासाठी ७.२७ कोटी नागरिकांनी मतदान केले. यापैकी ३.४७ महिला होत्या. ३,३७७ तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला.
राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी – बिहार – ४९.९२ टक्के, हिमाचल प्रदेश – ६६.१८ टक्के, मध्य प्रदेश ६९.३८ टक्के, पंजाब – ५८.८१ टक्के, उत्तर प्रदेश ५४.३७ टक्के , प. बंगाल – ७३.०५ टक्के , झारखंड – ७०.५ टक्के, छत्तीसगड – ६३.५७ टक्के