Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपचे मणिपूर मधील सरकार अडचणीत , NPF दिले पाठिंबा काढून घेण्याचे संकेत

Spread the love

मणिपूरमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असतानाही नागा पिपल्स फ्रंटने (NPF) आणि इतरांच्या मदतीने भाजपने सरकार तयार केले खरे पण NPF राज्यातील भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढण्याची घोषणा केली असल्याने भाजपचे सरकार धोक्यात आले आहे. विधानसभेच्या ६० जागांमध्ये एनपीएफचे ४ आमदार आहेत. भाजपचे के. एन. बीरेनसिंह हे मुख्यमंत्री आहेत. २०१७ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले. पण भाजपने इतर पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे.
तात्विक मुद्द्यावरून आम्ही भाजप सरकारचा पाठिंबा काढत आहोत.

भाजपच्या उदासिनतेमुळे आम्ही हा निर्णय घेतोय. लोकसभा निवडणुकीनंतर हा पाठिंबा काढून घेतला जाईल, असं एनपीएफचे नेते टी. आर झेलिअंग यांनी ट्विटमधून स्पष्ट केलंय. मणिपूरमध्ये काँग्रेसचे २८, भाजपचे २१, एनफीएफचे ४, एनपीईपीचे, टीएमसीचे प्रत्येकी १ आणि एक अपक्ष आमदार आहे. विरोधक विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांचीही भेट घेतली. नायडू यांच्या या हालचाली तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेकडे वाटचाल करणाऱ्या दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकांमध्ये यावेळी कोणत्याच पक्षाला एकहाती बहुमत मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शह देऊन सत्तेत येण्यासाठी देशभरातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!