पत्नीला पळवून नेणाऱ्या प्रियकराला आणि त्याच्या दोन बहिणींना झाडाला बांधून बेदम मारहाण , पाच अटकेत

पत्नीला पळवून घेऊन जाणाऱ्या पत्नीच्या प्रियकराला आणि त्याच्या दोन चुलत बहिणींना झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. सर्वांसमक्ष अनेक तास हा निंदनीय प्रकार सुरु होता. परंतु कुणीही त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले नाही. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील अर्जुन कॉलनी परिसरात मंगळवारी ही घटना घडल्याचे वृत्तआहे.
हल्लेखोरांमध्ये महिलेचा पती सुद्धा होता. या तिघांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. मुलींचा विनयभंग करण्यात आला. युवक आणि महिलेला पळून जाण्यासाठी मदत केली म्हणून मुलींना मारहाणही करण्यात आली. हे सर्व घडत असतान शंभरच्या आसपास लोक तिथे जमले होते. पण कोणीही त्यांची मदत करण्यासाठी पुढे आले नाही.
लोकांनी या घटनेचे व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी नऊ जणांविरोधात एफआयआर दाखल केला असून त्यातील चार जण फरार आहेत. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून त्यात तीन महिला आणि दोन पुरुष आहेत.
पोलिसांनी सांगितले कि , मुख्य आरोपी मुकेशची पत्नी काही दिवसांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेली होती. दाही पोलीस स्टेशनमध्ये त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्याला पत्नीची माहिती मिळाली. त्याने पत्नीच्या प्रियकराशी संर्पक साधून तडजोडीसाठी अर्जुन कॉलनी येथे बोलावले. जेव्हा युवक त्याच्या बहिणींसोबत तिथे पोहोचला तेव्हा मुकेश आणि त्याच्या कुटुंबियांनी तिघांना झाडाला बांधून मारहाण केली. मुलींचा विनयभंग केला.