दादरच्या पोलीस काॅलनीत सिलिंडरचा स्फोट , आगीत एका मुलीचा करुण अंत

मुंबईतील दादर पोलीस (सैतान चौकी) वसाहतीला आज दुपारच्या सुमारास आग लागली. पाच मजली असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत एका मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच तीन घराचे नुकसान झाले आहे.
दादरच्या परिसरात असलेल्या सैतान चौकीतील वसाहतीला आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. ही आग तीन घरांपर्यंत पोहोचली. यात तिनही घरांचे नुकसान झाले आहे. या आगीत एका मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे.