Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ममता-मोदी यांच्यात कलगीतुरा : ५६ इंचाची छाती तुमची, तुम्हाला झापड मारुन मी माझा हात का मोडून घेऊ…

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान होत असतानाच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दिदींची थप्पड माझ्यासाठी आशीर्वाद असेल या मोदींच्या उत्तराला ममता बॅनर्जी यांनी प्रत्यूत्तर दिले असून त्यांनी म्हटले आहे की,मी जर तुम्हाला थप्पड लगावली तर माझा हात मोडेल, असा पलटवार ममतांनी मोदींच्या टीकेवर केला आहे.

Advertisements

राज्यातील बशीरहाटमध्ये शनिवारी प्रचारसभा झाली. या सभेत ममतांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं. मोदींच्या कानाखाली मारण्याची भाषा मी कधीच केली नाही. त्यांना लोकशाहीची चपराक बसली पाहिजे, असं मी म्हणाले होते. मी तुम्हाला थप्पड का मारू? मी जर तुमच्या कानाखाली मारली तर माझाच हात मोडेल. तुमची छाती ५६ इंचाची आहे, मग मी तुम्हाला थप्पड कशी मारणार? असे ममता म्हणाल्या.

Advertisements
Advertisements

मोदींना लोकशाहीची चपराक बसली पाहिजे, असं ममता म्हणाल्या होत्या. ममतांच्या वक्तव्याला मोदींनी पुरुलिया येथील प्रचारसभेत प्रत्युत्तर दिलं होतं. दीदींना माझ्या कानाखाली मारायची आहे असं मी ऐकलं आहे. ममतांना मी दीदी म्हणतो. त्यांचा आदर करतो. तुमची थप्पड हा माझ्यासाठी आशीर्वाद असेल आणि म्हणून तेही सहन करण्याची तयारी आहे, असं मोदी म्हणाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!