Aurangabad : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून सख्ख्या चुलत भावाचा भोसकून खून

भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून सख्ख्या चुलत भावांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि त्यातील एकानं तरुणाच्या छातीत चाकू भोसकला. यात त्याचा मृत्यू झाला. आकाश शेळके असं मृताचं नाव आहे. चिखलठाणा येथील ऋषिकेशनगर येथे काल, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
संजय नगर / १६मधील मुकुंदवाडीत राहणारा आकाश मारोती शेळके (वय २०) आणि सचिन दशरथ शळके हे सख्खे चुलत भाऊ भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी ऋषिकेशनगर येथे आले होते. हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. सचिननं आकाशच्या छातीत चाकू भोसकला. यात जखमी झालेल्या आकाशचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी सचिन तेथून पसार झाला, अशी माहिती सिडको एमआयडीसी पोलिसांनी दिली.
चिकलठाण्यातील ऋषीकेश नगर शुक्रवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. सचिन दशरथ शेळके आणि त्याचा चुलत भाऊ आकाश मारोती शेळके यांच्यात जुना वाद होता. आकाश सेन्ट्रीग काम करतो तर सचिन सिडकोतील महाविद्यालयात शिकत आहे. या दोघांच्या भाचीच्या हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी होता.