News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

1. नवी दिल्लीः महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनाला आकर्षक रोषणाई
2. पुणेः महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला विधानभवनाच्या ऐतिहासिक इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई
3. सरन्यायाधीश रंजन गोगोई लैंगिक छळ प्रकरण: आरोप करणाऱ्या महिलेचा चौकशी प्रक्रियेत सहभागी होण्यास नकार
4. मुंबई उच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमूर्ती अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदावर नियुक्ती.
5. आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाची क्लीन चिट, वर्धामधील भाषणात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसने मोदींवर केला होता.
6. मुंबईः नाशिकमधील दुहेरी हत्याकांडप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या रामदास शिंदे याची फाशीची शिक्षा हायकोर्टाकडून रद्द. … हायकोर्टाने केवळ फाशीची शिक्षाच रद्द केली नाही, तर रामदास शिंदे याला निर्दोष मुक्तही केले. आरोप निर्विवाद सिद्ध होत नसल्याने संशयाचा फायदा देत हायकोर्टाने रामदासला निर्दाेष मुक्त केले
7. फनी चक्रीवादळानं धारण केलं गंभीर रूप; वायव्येकडे ७ किमी नॉटिकल अंतरावर सरकण्याची शक्यता…मुंबईतील नौदलाच्या समुद्री हवामान केंद्राची माहिती.
8. मुंबई : २०१४ साली मनसे आणि शिवसेना यांच्यात झालेल्या वादाप्रकरणी राहुल शेवाळे यांच्या पत्नीला एक वर्षाची शिक्षा; अपीलासाठी जामीन मंजूर.
9. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे ट्विटर अकाउंट हॅक, पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांना फॉलो केलं. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून कारवाई सुरू.
10. पुणेः लष्कराचे कर्नल विजय मिश्रा यांची मुलगी गार्गी (वय १९) हिचा अपघाती मृत्यू, हडपसरमधील वैदू पुलाजवळ ऑईलच्या टँकरला धडकल्याने डोक्याला अंतर्गत दुखापत. उपचारादरम्यान गार्गीचा मृत्यू.
11. कोल्हापूरः विवाहितेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील अमित सुळगावकर निलंबित, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची कारवाई, दुसऱ्या एका प्रकरणात अवैध व्यावसायिकांशी सलगी करून त्यांच्याकडून हप्तेवसुली दोन कॉन्स्टेबलना भोवली, गांधीनगर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल नारायण पांडुरंग गावडे आणि महादेव पी. रेपे निलंबित.
12. लखनौ – समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या भाषणावर निवडणूक आयोगाकडून पुन्हा एकदा 48 तासांची बंदी.
13. मुंबई – राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल