News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

1. शेतकऱ्याने कर्ज न फेडल्यास त्याला तुरुंगात टाकले जाणार नाही, राहुल गांधींचे आश्वासन, विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे घोटाळेबाज अद्यापही मोकाट. पण शेतकऱ्यांपासून पै पै वसूल केली जाते.
2. पुन्हा सत्ता द्या सर्व भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकूः पंतप्रधान मोदी, मध्यम वर्गावर कराचा बोजा टाकण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय. भ्रष्टाचार, महागाई आणि मालमत्ता कमावणे हाच काँग्रेसचा मंत्र आहे.
3. उद्धव ठाकरे माझे लहान भाऊ, वाराणसीत आल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी मानले आभार
4. अहमदनगर : आज राहुल गांधी येथे येतील, गरिबांना न्याय देतो म्हणतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. यापुढील काळात त्यांची भाषणे केवळ मनोरंजनासाठी ठेवली जातील : देवेंद्र फडणवीस
5. नाशिक : नरेंद्र मोदी भरघोस मतानी विजयी व्हावेत ही काँग्रेसचीच ईच्छा आहे; म्हणूनच प्रियांका गांधी यांना वाराणसीतून उमेदवारी दिली गेली नाही – प्रकाश आंबेडकर
6. काँग्रेसमध्ये राहून शिवसेनेच्या प्रचार सभांना जाणाऱ्यांनी आधी आमदरकीचा राजीनामा द्यावा, अशोक चव्हाण यांचे राधाकृष्ण विखेंना आव्हान. शिवसेनेच्या मंचावरून भाषण करणाऱ्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची कारणेदाखवा नोटीस
7. अहमदनगरः सत्तेसाठी शिवसेनेचा टायगर लाचार झाला आहे. आपल्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी जात नाहीत, पण अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे जातात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका
8. अहमदनगरः पारनेरमधील सुपा एमआयडीसी येथे एका गाडीतून ५ लाख रुपये किंमतीची दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, शिर्डी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत २२ लाख ८९ हजार रुपये रोख रक्कम आणि १६ हजार १७४ लीटर अवैध दारू जप्त, निवडणूक आयोगाच्या पथकाची कारवाई
9. मुंबई : गायक दलेर मेंहदी यांचा भाजपमध्ये प्रवेश
10. नाशिक : शेत मालाला भाव नाही म्हणून दोन महिन्यापासून अर्धनग्न अवस्थेत फिरत असलेल्या येवल्यातील कृष्णा डोंगरे दोन दिवसापासून पोलिसांच्या नजरकैदेत, मुख्यमंत्री सभेमुळे पोलिसांची दक्षता
11. कर्नाटकात विचारवंताची (ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश) हत्या झाल्यानंतर कोणाला कोर्टात याचिका करावी लागली नाही- मुंबई उच्च न्यायालय . इथे मात्र न्यायालयात कुटुंबियांना याचिका करावी लागली आणि त्यात कोर्टाला सतत निर्देश द्यावे लागतात- मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली खंत, दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणांत राजकारण्यांनी लुडबूड करू नये, तपास यंत्रणांना त्यांचं काम करू द्यावे.
12. नागपूर : विविध भागात २६ ते ३० एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट कायम राहणार : हवामान विभाग
13. नाशिकमध्ये दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू; दोन युवक गंभीर
14. मुंबई – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना गावबंदी आणि तोंड काळे करण्याचा इशारा देणारे भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमूख अशोकभाऊ कांबळे घाटकोपर पोलीसांच्या ताब्यात