23 मई को जनता की अदालत में फैसला होकर रहेगा कि कमलछाप चौकीदार ही चोर है : राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा ट्विट करत भाजपाला लक्ष केले आहे. ‘चौकीदार चोर है’च्या हॅशटॅगसोबत राहुल गांधी यांनी भाजपा आणि मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. कमळछाप चौकीदार चोर असल्याचे २३ मे रोजी जनतेच्या न्यायालयात स्पष्ट होईल.
राहुल गांधी यांनी आज सोमवारी दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात ‘चौकीदार चोर है’साठी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्यांचे हे ट्विट आले आहे. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. काही नेटीझन्सनी राहुल यांचे स्वागत केले आहे. तर काहींनी राहुल गांधीवर निशाना साधला आहे.
काय आहे राहुल गांधी यांचे ट्विट –
कमळछाप चौकीदार चोर असल्याचे २३ मे रोजी जनतेच्या न्यायालयात स्पष्ट होईल. न्याय होणारच..! गरिब जनतेपासून पैसा लुटून श्रीमंत मित्रांना मदत करणाऱ्या चौकीदाराला शिक्षा होणारच.