News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या : मोदी शहिदांच्या नावाने मते मागताहेत: हार्दिक पटेल

युपीए सरकार सत्तेत असताना जीएसटी, नोटाबंदी, एफडीआयला भाजपने तीव्र विरोधात करत आंदोलन केले. पण सत्तेत आल्यावर त्याची अंमलबजावणी केली. गेल्या पाच वर्षात देशाच्या जनेतेला केंद्रातील भाजप सरकारने मूर्ख बनवण्याचे काम केले. देशाची दिशाभूल केली, असा आरोप काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी केला.
मुंबई काँग्रेसने अंधेरी पश्चिम येथील चित्रकुट मैदानात युवा संमेलन आयोजित केले होते. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकरही यावेळी उपस्थित होत्या. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच फेसबुक, ट्विटरवरून उर्मिला मातोंडर यांच्यावर वादग्रस्त टीका केल्या जात आहेत. त्या कुठून आल्या, कुठल्या समाजाच्या आहेत असे प्रश्न विचारले जात आहेत. पण याच उर्मिला मातोंडकर किंवा मी भाजपमध्ये असतो तर आमचा सन्मान झाला असता. उर्मिला मातोंडकराना पद्म पुरस्कार दिला गेला असता, अशी टीका हार्दिक पटेल यांनी केली.
जगभरात निवडणुका होतात. कुठले पंतप्रधान म्हणाले मी चौकीदार आहे, मला मत द्या. मी चहावाला आहे, मत द्या. असं कुठल्या निवडणुकीत कोणत्याच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणाले नाहीत. पण भारतात असं म्हटल्यावर टाळ्या वाजवल्या जातात. ही परिस्थिती बदलवायची आहे. चांगले शिक्षण, शेतमालाला दुप्पट भाव, महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार हवा आहे. यासोबतच देशाचा तरुण जो सीमेवर आहे तो जवानही सुरक्षित राहिला पाहिजे, असं हार्दिक पटेल म्हणाले.
काश्मीरमध्ये जवान शहीद होत आहेत. दुसरीकडे पंतप्रधान मोदी जवानांच्या नावाने पोस्टर्स बनवत आहेत. त्यांच्या नावाने मत मागत आहेत. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा हिशेब जनतेसमोर मांडा. किती रोजगार दिले, शेतकऱ्यांसाठी काय कामं केली, जीडीपी किती वाढला ते सांगा, शिक्षणात काय सुधारणा केली ते मांडा आणि मग मत मागा. पण भाजप सरकारकडे बोलण्यासारखं काहीच नाही. म्हणूनच ते काश्मीर, भारत आणि पाकिस्तानच्या नावाने मत मागत फिरत आहेत, असा आरोप हार्दिक पटेल यांनी केला.
गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या….
1. भाजपविरोधात बोलल्याने पोलिसात तक्रारः उर्मिला मातोंडकर
2. मुंबईः‘भाभीजी घर पर है’ आणि ‘तुझसे है राबता’ या हिंदी मालिकांमधून भाजपचा प्रचार: कॉंग्रेसचे आरोप; उद्या निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार
3. कोल्हापूरः भाषण करण्यासाठी राष्ट्रवादीत माणसेच नसल्याने उसना कीर्तनकार आणल्याची माजी भाजप महिला प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांची राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका
4. औरंगाबादः अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी नंदू शेलार याला साथीदरसह अटक
5. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ या चार लोकसभा मतदार संघांमध्ये आचारसंहिता भंग केल्याचे ७० गुन्हे दाखल
6. लोकसभाः उत्तर प्रदेशमध्ये सप आणि बसप एकाही जागेवर निवडून येणार नाहीत; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा
7. नागपूरः सत्ता आली की समॄद्धी, राफेल घोटाळ्याची चौकशी करणार; नरेंद्र मोदी यांना तिहार जेलमध्ये पाठविणार: पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य
8. औरंगाबाद: धुणे-भांड्याचे काम करणाऱ्या १७ वर्षीय मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणात आरोपी प्रणयशील यशवंतराव गजभिये याला भंडारा जिल्ह्यातून अटक व न्यायालयीन कोठडीत रवानगी
9. दिल्लीः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रथमच राष्ट्रीय युद्ध स्मारकाला उद्या देणार भेट
10. उत्तर प्रदेश: भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी काँग्रेसने उमेदवार दिले; मायावतींनी साधला काँग्रेसवर निशाणा
11. उत्तर प्रदेश: विरोधकांविरोधात सीबीआय, ईडीचा केंद्र सरकारकडून दुरुपयोग; मायावतींची भाजपवर टीका
12. पश्चिम बंगाल: बंगालमध्ये आता गुंडगिरी चालणार नाही, हा लोकांनी केलेला निश्चय आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
13. मध्य प्रदेश: आयकर खात्याचे विविध ५० ठिकाणी छापे, प्रतिक जोशी यांच्या निवासस्थानातून कोट्यवधींची रोकड जप्त
14. अमित शहा यांची प्रकृती बिघडली; गडचिरोली, चंद्रपुरातील सभा रद्द
15. मुंबई पोलिसांची कारवाई; दारु, अंमली पदार्थ आणि अवैध शस्त्र जप्त
16. फिर एक बार, मोदी सरकार; भाजपाकडून टॅगलाईनची घोषणा
17. अकोट येथे मल्लिकार्जुन खर्गे यांची सभा, देश मोदी नव्हे तर संघ चालवत आहे – खर्गे
18. नागपूर : केंद्रीय मंत्री व भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांचा निवडणूक वचननामा जाहीर.