Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ऐन निवडणुकीच्या काळात आयकर खात्याच्या धाडी , विरोधकांवर दहशतीचा प्रयत्न : चिदंबरम

Spread the love

ऐन निवडणुकीच्या काळात आयकर खाते कमालीचे  असून खात्याच्या वतीने टाकल्या जाणाऱ्या धाडीच्या विरोधात राजकीय पातळीवरून टीका होत आहे . खास करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केले असल्याचा आरोप होत आहे . राजकीय नेत्यांनी या कारवाई वर आपल्या तीव्र प्रतिक्रिया  दिल्या आहेत . चिदंबरम यांनी ट्विट करून आयकर विभागाकडून होत असलेल्या धाडसत्रावर टीका केली आहे. आयटी विभाग शिवगंगा आणि चेन्नईमध्ये माझ्या घरावर धाड मारणार असल्याचं मला समजलं आहे. आम्ही या सर्च पार्टीचं स्वागत करतो. आमच्याकडे लपविण्यासारखं काहीच नाही, हे आयकर विभागालाही माहीत आहे. आयटी विभाग आणि इतर विभागांनी आमच्या घरी पूर्वीही छापे मारले आहेत. परंतु, त्यांना काहीच मिळालं नाही. केवळ निवडणूक प्रचारात अडथळे निर्माण करण्यासाठी आणि निवडणुकीवर परिणाम घडवून आणण्यासाठीच हे धाडसत्र करण्यात येत असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला आहे. जनता सर्व पाहत आहे आणि या सरकारला निवडणुकीत त्याचं सडेतोड उत्तर दिलं जाईल, असंही चिदंबरम यांनी म्हटलंय.

काल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने धाडी मारल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी त्यावर टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार माझ्याही घरावर छापा मारणार असल्याचं समजतंय. निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठीच धाड मारण्याचं षडयंत्र रचलं जात असून आम्ही या ‘सर्च पार्टी’चं स्वागत करत आहोत, अशी खोचक टीका चिदंबरम यांनी केली. रविवारी आयकर विभागाने कमलनाथ यांच्या दोन निकटवर्तीयांच्या घरी आणि कार्यालयावर छापे मारले. त्यात त्यांना मोठं घबाड सापडलं असून आयकर विभागाने दिल्ली, गोवा, इंदूर आणि भोपाळमध्येही छापे मारल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, विकास आणि आपल्या कामाबाबत बोलण्यासाठी काहीच उरत नाही, तेव्हा विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून अशीच खेळी केल्या जाते, अशा शब्दांत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपवर टीका केली. संविधानिक यंत्रणांचा हे लोक कशा पद्धतीने वापर करत आले आहेत, हे संपूर्ण देश जाणून आहे, असं सांगतानाच राजकीय पक्ष आणि अनेक राज्यांमध्ये भाजपने केलेली षडयंत्रच त्याची साक्ष देतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे . आयकर विभागाने मारलेल्या छाप्याबाबतची स्थिती अजून स्पष्ट झालेली नाही. संपूर्ण माहिती हाती आल्यावरच त्यावर काही बोलता येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!