औरंगाबाद लोकसभा : काँग्रेस बंडखोर अब्दुल सत्तार यांची माघार , रंगणार चौरंगी सामना

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात बहुचर्चित तथा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आ.अब्दुल सत्तार यांनी अपेक्षेप्रमाणे अखेरच्या दिवशी अर्ज परत घेतला. आता या मतदार संघात चौरंगी लढत होत असून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच उमेदवार आ. सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांच्यात चौरंगी सामना होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याशिवाय नारायण राणे पुरस्कृत मराठवाडा सेनेचे उमेदवार पूर्वाश्रमीचे शिवसैनिक सुभाष पाटील हे सुद्धा मैदानात असून ते किती मते आपल्याकडे खेचून घेतात हे पाहणे सुद्धा आत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या 24 तासातील राजकीय घडामोडी पहाता काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आ. अब्दुल सत्तार यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी मागे घेतली तर शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांना निवडणूक मैदानातून माघार घेण्याचे शिवसेनेचे प्रयत्न अपयशी ठरले. आ. हर्षवर्धन जाधव यांना मातोश्रीवरुन निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचेजोरदार प्रयत्न करण्यात आले होते. मात्र या प्रयत्नांना आ. हर्षवर्धन जाधव यांनी जुमानले नाही आणि खा. चंद्रकांत खैर यांचा पराभव करण्यासाठी आपण निवडणूक मैदानातच राहणार असल्याचा निश्चय करुन त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी खा. चंद्रकांत खैर, आ. सुभाष झांबड, आ. इम्तियाज जलील, आ. हर्षवर्धन जाधव, सुभाष पाटील या प्रमुख उमेदवारासह एकूण 23 उमेदवार आता निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
खा. चंद्रकांत खैरे
शिवसेना-भाजप रिपाइं महायुतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे हे पाचव्यांदा लोकसभेत जाण्यास उत्सूक असून हिंदत्ववादी ु मतांचे विभाजन होऊ नये यासाठी त्यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे दीड लाख मते घेणारे शांतीगिरी महाराज यांच्याशी चर्चा करुन त्यांनी निवडणूक रिंगणात उभे राहू नये, त्यासाठी यशस्वी प्रयत्न के ले, ते प्रयत्न फळास आले..शांतीगिरी महाराजांनी त्यांना ‘यशस्वी भव’ म्हणून आशीर्वादही दिला. त्यामुळे खा. खैरे यांच्या विजयाचा मार्ग काही प्रमाणात सुकर झाला आहे. ही महायुतीसाठी दिलासादायक बाब ठरली आहे. शांतीगिरी महाराज यांनीही खा. खैरे आणि माझ्यात समाधानकारक चर्चा झाल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट के ले. खा. खैरे यांनी काहीच विकास के ला नाही. 20 वर्षात त्यांनी काहीच के ले नाही, असे आरोप विरोधक करीत असून खैरेंसाठी निवडून येणे एक आव्हानच झाले आहे. निवडून येण्यासाठी खैरे आणि शिवसैनिकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार असून गेल्यावेळीप्रमाणे त्यांना ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही.
आ. सुभाष झांबड
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड हे नवा चेहरा म्हणून महाआघाडीने रिंगणात उतरवले आहे. आ. झांबड यांना निवडून येणे ‘लाख मैलाचा’ दगड या म्हणीप्रमाणे असून अशा परिस्थितीत ते चांगली टक्कर देतील. सर्व अर्थाने सधन असलेले आ. झांबड यांना व्यापारी व उद्योजक वर्गाचा मोठा पाठिं बा आहे. खा. खैरे विरुद्ध असलेल्या जनतेच्या नाराजीचा फायदा ते कसे घेतात यावर बरेच काही अवलंबून आहे. शिवसेना भाजपचे परंपरागत हिंदत्ववादी मतदान ते आपल् ु याकडे कशारितीने वळवतात तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे हक्काचे मतदान कितपत मिळवितात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यांच्या प्रचाराचे काँग्रेसचे माजी आ. डॉ. कल्याण काळे, ज्येष्ठ नेते प्रकाश
मुगदिया, माजी महापौर अशोक सायन्ना, राष्ट्रवादीचे आ. सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. विक्रम काळे, अभय पाटील चिकटगावकर आदी नियोजन करीत आहेत. त्यांची सरळ लढत खा. चंद्रकांत खैरे यांच्याशी असून या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
आ. इम्तियाज जलील
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार आ. इम्तियाज जलील यांनाही लोकसभेत जाण्याची इच्छा असून मुस्लिम, दलित आणि बहुजनांच्या मतावर त्यांची दाराेमदार
आहे. शहर मध्यमधून सेनेचे माजी आ. प्रदीप जैस्वाल आणि भाजपचे माजी आ. किशनचंद तनवाणी या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा या युक्तीप्रमाणे ते आमदार होण्यात यशस्वी ठरले. आता त्यांना लोकसभेचे दार खुनावत असून आपण विजयी होऊ, असा त्यांना विश्वास वाटत आहे. असे असेल तरी माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अं तुले, औरगं ाबादचे
शिल्पकार माजी मंत्री डॉ. रफिक झके रिया यांच्या पराभवाचा इतिहास कोणीही नाकारु शकत नाही. त्या तुलनेत जलिल हे अननुभवी असून ते किती मतदान घेतात आणि कोणाचे जायंट किलर ठरतात हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. शहरी भागात त्यांना बऱ्यापैकी मतदान होण्याचा अं दाज असून ग्रामीण भागात त्यांना किती प्रतिसाद मिळतो. ते पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चौरगं ी लढतीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला किमान 3 लाखावर मते अपेक्षित आहे ती मते ते घेतील का? हाच खरा प्रश्न आहे.
आ. हर्षवधन जाधव
कन्नडचे आ. असलेले हर्षवधन जाधव हे के वळ खा. चंद्रकांत खैरे यांच्या पराभवासाठी निवडणूक रिंगणात अतरले आहेत. त्यांचे वडिल दिवंगत माजी आ. रायभान जाधव, आई
माजी आ. तेजस्विनी जाधव यांच्या पुण्याईने ते दोन वेळा कन्नडचे आमदार झालेत. खा. खैरे यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठीही प्रयत्न के ले, परंतु या प्रयत्नांना यश आले नाही. म्हणून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निश्चय केला. कन्नड विधानसभा मतदार संघातून त्यांना मतदान होणार असेल तरी
वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, औरगं ाबाद मध्य, पूर्व आणि पश्चिम येथून त्यांना मतदार कितपत स्वीकारतात, हा मोठा प्रश्न आहे. त्यांचा पक्ष नवखा असून जिल्ह्यात किं वा अन्य ठिकाणी पक्षाचे संघटन नाही. त्यांच्यामागे मोजके च कार्यकर्ते असून काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्ल सत् दु तार यांच्या मदतीने ते नशीब आजमावित आहेत. खा. खैरे
यांना पाडण्यासाठीच आपण उभे आहोत, असा त्यांचा ‘मेसेज’ असून त्यांचा हा प्रयत्न अंगलटही येऊ शकतो, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.