News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या : “संविधानाचा सरनामा हाच वंचित बहुजनांचा जाहीरनामा”

1. वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा: शेतकऱ्यांना वर्षातून दोन वेळा प्रत्येकी सहा हजार असे वार्षिक बारा हजार रुपयांचे अनुदान देणार. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणार. भारतीय संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा: वंचित बहुजना आघाडीची घोषणा. गुजरातसह सर्व दंगलींची फेर चौकशी करणार. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनांची चौकशी केंद्रीय पातळीवर करणार. ईव्हीएम रद्द करून मतपत्रिकेद्वारे मतदान पुन्हा सुरू करणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेच्या चौकटीत आणणार.
2. मुंबई: नरेंद्र मोदींना संधी दिली त्यांनी देश खड्ड्यात घातला, आता राहुल गांधींना संधी देऊन बघूया? – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
3. दिल्ली: माजी उपसेना प्रमुख सरथ चंद यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
4. पुणे: देशाच्या राज्यघटनेला वाचविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत सामील , मी मार्क्सवादी असलो तरी आंबेडकरवादी आहे . राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यामागे कोणतीही अट नाही- जयंत पाटील, शेकाप नेते
5. जुहू बलात्कार प्रकरण: घटनेमुळे परिसरात संताप… लोकांची जुहू पोलीस ठाण्याबाहेर गर्दी… आरोपीला ताब्यात देण्याची जमावाची पोलिसांकडे मागणी.
6. औरंगाबाद: सिंधी समाजाच्या वतीने सिंधी कॉलनी भागातून शहरात झुलेलाल जयंतीनिमित्ताने वाहन फेरी काढण्यात आली.
7. नोटाबंदी हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. मी जड अत:करणाने भाजप सोडत आहे; काँग्रेस पक्षात प्रवेश करताना खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले मनोगत.
8. नवी दिल्ली – शत्रुघ्न सिन्हा पाटणासाहिब येथून लढवणार लोकसभा निवडणूक, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर
9. बीड – प्रतीक्षा गौतम जाधव या शिक्षिकेने बाथरूममध्ये कोंडून घेत स्वत:ला पेटविले; गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
10. जालना – पाणी शेंदताना दीपाली विष्णू शिंदे या युवतीचा विहिरीत पडून मृत्यू, भोकरदन तालुक्यातील गोकुळ येथील घटना
11. उत्तर प्रदेश – डिंपल यादव यांनी कन्नौज मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज, अखिलेश यादव यांच्यासह समाजवादी पार्टी आणि बसपाच्या नेत्यांची उपस्थिती