मोदी , शहा दोघांनीही थापा मारल्या , पैसे द्यायला आले तर घ्या आणि या लोकांच्या पार्श्वभागावर लाथ मारा आणि हाकलून द्या : राज ठाकरे

आमच्या पंतप्रधानांची जगभरात फेकू अशीच ओळख, करा इंटरनेटवर सर्च- राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या बोलघेवड्यापणावर टीका केली आहे. आमच्या पंतप्रधानांची जगभरात फेकू अशीच ओळख आहे, इंटरनेटवर फेकू शब्द टाईप केला तर मोदींच नाव येतं. ही माझ्या पंतप्रधानांची इमेज जगभरात आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. इंदिरा गांधींनंतर 30 वर्षांनी एका पक्षाला या देशात बहुमत मिळालं. भारताचं पंतप्रधान होण्यासाठी अनेकांची हयात गेली.
लालकृष्ण अडवाणींनी सत्तेपर्यंत पक्ष आणला, त्यांनाही पंतप्रधान व्हायचे होते, पण नाही होऊ शकले. नरेंद्र मोदी या माणसाला ही सगळी संधी मिळाली, पण तरीही हा माणूस देशाशी खोटं बोलत राहिला. गेल्या पाच वर्षांत या माणसानं पत्रकार परिषद घेतलेली नाही. आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं नाही, म्हणूनच पत्रकारांना हा माणूस सामोरं गेला नाही. मी रतन टाटांच्या सांगण्यावरून त्यावेळी गुजरातला गेलो, तिथे मला जे जे दाखवलं त्यावरून मी माझं मत बनवलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की मला तेवढंच दाखवलं गेलं जेवढं दाखवयाच्या लायकीचं होतं.
राहुल गांधी म्हणाले तसे ह्या मोदींनी खूप काही शिकवलं. मला कोणाच्या खाजगी आयुष्यात जायचं नाही पण नरेंद्र मोदी वर्षातून एकदा आईला भेटायला जातात त्यावेळी मीडियाला घेऊन का जायचं? नोटबंदीच्या वेळेला स्वतःच्या आईला रांगेत उभं केलं. भावनिक राजकारण करायचं म्हणून कुठल्या थरापर्यंत जाणार तुम्ही? ह्यातून मोदींचा दृष्टिकोन कळतो. नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्याच्या आधी ज्याला ज्याला विरोध केला त्या त्या गोष्टी त्यांनी सत्तेत राबवल्या.
नरेंद्र मोदी हिटलरची कॉपी करत आहेत-राज ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटलरची कॉपी करत आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केला. एवढंच नाही तर यांच्याविरोधात बोललं की देशद्रोही ठरवून मोकळं व्हायचं ही हिटलरची संकल्पना आहे. त्याचीच कॉपी आता नरेंद्र मोदी करत आहेत अशीही टीका राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात ही टीका केली आहे. तसेच अच्छे दिन ही मूळ संकल्पना रूझवेल्ट यांच्या वडिलांची आहे Happy Days will come असा नारा त्यांनी दिला होता. आता मोदींनी याच दोघांची कॉपी केली आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला. आपल्या भाषणा दरम्यान राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं खोटं बोलत आहेत त्याच्या काही व्हिडिओ क्लिप्सही सादर केल्या.
माझ्या दहा सभा आहेत त्या तुमच्यासाठी रिमाईंडरचं काम करणार आहेत. मोदींना एकहाती सत्ता मिळाल्यावर त्यांना कितीतरी गोष्टी करता आल्या असत्या मात्र त्यांनी काहीही केलं नाही. त्यांनी फक्त काँग्रेसच्या योजनांची नावं बदलली असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री जनधन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, सरदार पटेल नॅशनल अर्बन हाऊसिंग मिशन ही सगळी नावं भाजपाने बदलली आहेत. या मूळ काँग्रेसच्या योजना आहेत असाही आरोप राज ठाकरेंनी केला.