Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : औरंगाबादमधून सुभाष झांबडच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, पक्षाचा बी फॉर्म मिळाला : एक नजर : महत्वाच्या बातम्या …

Spread the love

1. औरंगाबाद: सुभाष झांबड काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, पक्षाचा बी फॉर्म मिळाला. दोन दिवसांपासून होते बी फॉर्मच्या प्रतीक्षेत

2. औरंगाबाद : निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री एपीआय कॉर्नर येथे अठरा लाख रुपये जप्त केले.

3. औरंगाबाद: अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला

4. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज भरला

5. मुंबई: वंचित बहुजन आघाडीतर्फे दक्षिण मुंबईतून जे. जे. हॉस्पिटलचे डॉ. अनिल कुमार यांना उमेदवारी

6. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी भरला अर्ज

7. पुणे: काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, प्रवीण गायकवाड यांचा शब्द

8. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 5 एप्रिलला पुणे दौऱ्यावर; 5000 विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

9. गुजरातमधील सहा उमेदवारांच्या नावांची  काँग्रेसने केली घोषणा.

10. दिल्लीः भाजपची उमेदवारांची यादी जाहीर, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी

11. नागपूर: पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्याविरुद्ध लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, अटक व जामिनावर सुटका; प्रचार सभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींबाबत केले होते आक्षेपार्ह व्यक्तव्य. कवाडेंकडून दिलगिरी व्यक्त

12 . नागपूर: गुंगीचे औषधी देऊन १६वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर जरीपटका भागात उघडकीस आली घटना

13. ‘तिहार’मधून गौप्यस्फोट होईल या भीतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली: पंतप्रधान मोदी

14. पुणे: आम आदमी पक्ष राज्यात लोकसभा निवडणूक लढणार नाही; पक्षाचे राज्य समन्वयक ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांची घोषणा

15. गोंदियाः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात, तीन जण जखमी

16. मुंबईः चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर गोळीबार करणाऱ्या ओबेद रेडिओवाला याला उद्यापर्यंत पोलीस कोठडी

17. कोल्हापूर: हातकणंगलेतील गगनबावडा रोडवरील फुलेवाडी आणि यड्राव फाटा येथे दोन कारमधून सुमारे १२ लाख किंमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

औरंगाबाद: सात मतदार संघावर प्रभाव पाडू, औरंगाबाद लोकसभा लढवणार नाही; शांतिगिरी महाराज यांचे प्रतिपादन

18. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं ‘नमो टीव्ही’संबंधी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून मागितलं उत्तर

19. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ८ एप्रिलला उस्मानाबादेत सभा

20. नरेंद्र मोदींना मते देऊ नका, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे अल्पसंख्याकांना आवाहन

21. औरंगाबाद : दुचाकी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग; २५ ते ३० दुचाकी जळून खाक. मुंबई-नागपूर महामार्गावर तिसगावजवळची घटना.

22. ताजी बातमी: अहमदाबादहुनभाजपकडूनपरेशरावळयांच्याईएवजीएचएसपटेलयांनाउमेदवारी

23. वाढत्या द्वेषाविरोधात देशातील महिला ४ एप्रिलला रस्त्यावर उतरणार

आपलं सरकार

Click to listen highlighted text!