लोकसभा २०१९ : असे काय लिहिले संजय राऊत यांनी कि, निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली !!

शिवसेना पक्षाचे मुखपत्र असणाऱ्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरात बेगुसराय मतदार संघासाठी लिहिताना कन्हैयाकुमारसारखी विषवल्ली लोकसभेत जाता कामा नये भलेही ईव्हिएम घोटाळा केला तरी चालेल असे लिहील्याने त्यांच्या या लिखाणावर तीव्र आक्षेप घेत मुंबई जिल्हा निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आयोगाने बजावलेली नोटिसीमुळे संजय राऊत अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. चंद्रमा ३ एप्रिलपर्यंत त्यांना या नोटिसीचे ऊत्तर देण्यास सांगितले आहे.
रोखठोकया सदरात सामना वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याच्यावर टिपण्णी केली आहे. यामुळे वाद निर्माण झाला. सदर बाब आचारसंहितेचे उल्लंघन ठरत असल्यामुळे याची दखल घेत निवडणूक आयोगाने राऊत यांना नोटीस बजावली आहे. ‘कन्हैय्या कुमार बिहारमधील बेगुसराय या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. देशद्रोहाचा खटला सुरू असलेली व्यक्ती लोकसभा निवडणूक लढवत आहे. बेगुसराय येथून कन्हैय्या कुमार कदापि निवडून येता कामा नये. ही विषवल्ली संसेदत पसरता कामा नये. भारतीय जनता पक्षाने याची दखल घ्यावी. यासाठी ईव्हीएम यंत्रामध्ये फेरफार करावा लागला, तरी चालेल. कन्हैय्या कुमारचा विजय म्हणजे भारतीय संविधानाचा पराभव असेल.’, असे संजय राऊत यांनी आपल्या सदरात म्हटले आहे.
सामना वर्तमानपत्रात सदर प्रसिद्ध झाल्यानंतर वाद निर्माण झाला. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून संजय राऊत यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीत ३ एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.