Loksabha 2019 : नागभूमीत प्रकाश आंबेडकर, ओवेसींची धडाकेबाज सभा , संघ, भाजप आणि आघाडीवर महाप्रहार !!

विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी लोकसभेच्या होणा-या निवडणुकीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते खा.असदुद्दीन ओवेसींच्या सभेने नागपुरातील गर्मी अधिकच वाढली. या प्रचारसभेत या दोन्हीही नेत्यांनी नरेंद्र मोदी, काॅंग्रेस आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली.
यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चौकीदाराची नोकरी आजघडीस धोक्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे ते रोजगार उपलब्ध करुन देऊ शकले नाही आणि शेतकऱ्यांचे प्रश्नही सोडवू शकले नाही. त्यामुळे आता हींदू-मुस्लीम मुद्दा उचलून प्रचार करीत असल्याचे वंचित बहूजन आघाडीत सामील झालेले आणि एमआयएमचे सवेसर्वा असद्दूद्दीन ओवेसी म्हणाले.
भाजपने संविधान कमजोर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याच राज्यात पत्रकारांसमोर आले. विदर्भातील शेतकरी आत्महया थांबल्या नाहीत आणि हे दहशतवाद संपवल्याचे सांगतात. कॉंग्रेस नेते आणि शरद पवार यांच्यात धमक नाही. फक्त अजित पवार यांना वाचविण्याईतकच त्यांच कर्तृत्व राहीलेले असल्याचेही ओवेसींच्या म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनीही यावेळी काॅंग्रेस, संघ आणि भाजपवर घणिघाती टीका केली. गडकरी यांचे नाव न घेता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तुम्ही नागपूरला का नाही उभं राहिलेलं ? मी म्हटले उंदराला मारायला वाघ कशाला पाहिजे ? त्याला कुणीही मारु शकतं. आणि उपस्थितांमध्ये प्रचंड हशा पिकला. नागपूर या पावन भूमीवर आरएसएस वाल्यांनी कब्जा केलेला आहे. फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी ठरवले तर हा कब्जा संपूर्ण शकतो. या निवडणुकीत तुम्हाला ही भूमी त्यांच्या कब्ज्यातून काढायची आहे हे लक्षात ठेवा असे सांगून त्यांनी “वंचित’च्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.