Keral Loksabha : राहुल गांधी यांच्या वायनाड मधील उमेदवारीला डाव्यांचा जोरदार विरोध , पराभव करण्यासाठी येणार एकत्र

केरळचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ डावे नेते पी. विजयन यांनीही राहुल गांधी यांच्या वायनाड येथून निवडणूक लढवण्याबाबत नाराजी व्यक्त केली असून त्यांनी म्हटले आहे कि , ” राहुल गांधी हे केरळमधील २० पैकी एका जागेवरून निवडणूक लढवत आहेत. त्यातून काही वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही. आम्ही त्यांच्याविरोधात लढणार आहोत. राहुल गांधी यांना दोन ठिकाणांहून लढायचे होते तर त्यांनी जिथे विरोधात भाजपाचा उमेदवार असेल, अशा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे होती. काँग्रेसने आज घेतलेला निर्णय म्हणजे डाव्यांशी पुकारलेला थेट लढा आहे.”असे विजयन म्हणाले.
कांग्रेसने घेतलेला निर्णय म्हणजे काँग्रेसने डाव्या पक्षांविरोधात लढल्यास वायनाड मध्ये त्यांचा पराभव करू असे डाव्या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने उचललेले हे पाऊल म्हणजे २०१९ मध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठीच्या काँग्रेसच्या कटिबद्धतेविरुद्ध आहे, असे डाव्या पक्षांचे म्हणणे आहे.
सीपीएमचे माजी महासचिव महासचिव प्रकाश करात यांनी सांगितले की, “वायनाड येथून राहुल गांधींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा काँग्रेसचा निर्णयाचा अर्थ आता केरळमध्ये डाव्यांविरोधात लढण्यालाच काँग्रेसचे प्राधान्य आहे, असा होतो. एकीकडे काँग्रेसवाले भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगतात. तर दुसरीकडे ते वायनाड येथून राहुल गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात.”