News Updates गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

1. लोकसभा निवडणूक: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व नांदेडमधील उमेदवार खासदार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळले
2. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी २ एप्रिल रोजी पक्ष मुख्यालयात जाहीरनामा जाहीर करणार
3. बिहार: कन्हैय्या कुमारच्या प्रचारासाठी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी बेगुसरायमध्ये दाखल
Kanhaiya Kumar
@kanhaiyakumar
गांधी और सरदार पटेल वाले गुजरात से मेरा दोस्त आ गया है, घर-घर जाकर बेगूसराय के लोगों को मोदी और शाह के फ़र्ज़ी गुजरात मॉडल की सच्चाई बताने। बहुत से दोस्त बेगूसराय पहुँच गए हैं, आप भी आइए। सब मिलकर नोटतंत्र ओर भीड़तंत्र के चंगुल से लोकतंत्र को आज़ाद करवाते हैं। @jigneshmevani80
4. नागपूर: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्तेदेखील मी विजयी होणार असल्याचे सांगत आहेत. शरीराने काँग्रेससोबत असले तरी मनाने ते माझ्यासोबत आहेत. – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
5. औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. गजानन सुरासे यांचे निधन; उद्या होणार अंत्यसंस्कार
कोल्हापूर: कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्यास ५० लाखाचे बक्षीस; यापूर्वी माहिती देणाऱ्यास होते १० लाखांचे बक्षीस
6. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक सभेत भाषण करताना घराणेशाहीवर जोर देतात. मग मुख्यमंत्र्यांना विखे घराणं, मोहिते घराणं कसं काय चालतं ? – रोहित पवार, पुणे जिल्हा परिषद सदस्य, शरद पवारांचे नातू
7. बीड: भाजप उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या निवडणूक अर्जावर आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण
8. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची १ एप्रिल रोजी चंद्रपूर, अमरावती आणि नागपूर येथे जाहीर सभा
9. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश.
10. भारतानं आज अंतराळ क्षेत्राच्या इतिहासात मोठी झेप घेतली: नरेंद्र मोदी , महत्वाचा संदेश घेऊन येतोय…पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्विटद्वारे माहिती, ते कोणता संदेश देणार याबाबत होती देशभरात उत्सुकता.
Chowkidar Narendra Modi
✔@narendramodi
मेरे प्यारे देशवासियों,
आज सवेरे लगभग 11.45 – 12.00 बजे मैं एक महत्वपूर्ण संदेश लेकर आप के बीच आऊँगा।
I would be addressing the nation at around 11:45 AM – 12.00 noon with an important message.
Do watch the address on television, radio or social media.
11. राज्यभरात वीज महागणार, १ एप्रिलपासून महावितरण वीजदर सहा टक्क्यांनी वाढवणार
12. जयपूर: २०१९ नंतर तीन वर्ष युवा उद्योजकांना सरकारकडून परवानगीची आवश्यकता नसणार, तीन वर्षानंतर परवानगीसाठी अर्ज दाखल करु शकता – राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष
13. सोलापूर : पाच हजार रुपयांची लाच घेताना पाटबंधारे विभागाचा सहायक अभियंता अटकेत
14. भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघात बुधवारी अपक्ष तारका देविदास नेपाले यांनी आपले नामांकन मागे घेतले. आता 22 उमेदवार रिंगणात आहेत.
15. प्रसिद्ध कॅमेरामन “चारुदत्त दुखंडे” यांचं आज दुपारी पुण्यात अल्पशा आजाराने निधन
16. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेवर ममता बॅनर्जींचा आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार: तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, नोटाबंदीच्या चौकशीचं आश्वासन
17. अकोला : अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणा-या नराधमास पाच वर्षांची शिक्षा
18. भाजपाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर खाडे आडनाव असताना मुंडे नावाचा वापर करत असल्याचा उमेदवार कालिदास आपेट यांचा आक्षेप.
19. उस्मानाबाद : छाननी प्रक्रिया पूर्ण, 3 उमेदवारांचे 5 अर्ज अपात्र; 20 जणांचे 33 अर्ज शिल्लक, माघारीकडे सर्वांचे लक्ष.
20. रिपब्लिकन पक्षाचेसंघटक ऍड. गौतम भालेराव यांचे हृदविकाराच्या धक्क्याने गंगाखेड येथे निधन.
21. औरंगाबादेतील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत जी.एस.कांबळे यांचे निधन.