Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mood Maharashtracha : “डिसमूड ” युवा मतदारांचा !! कौल दाखविणाऱ्या चॅनल्सना सोशल मीडियावर शिव्यांची लाखोली

Spread the love

देशातीतील  लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सी व्होटर’ने केलेले सर्वेक्षण इलेकट्रोनिक मीडियाने जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर  या माध्यमांना चांगलेच ट्रॉल केले . अजून  ,नाही  प्रचार सुरु झाला नाही आणि यांनी निकालही घोषित करून टाकले यावर अनेकांनी आक्षेप घेत या सर्वेक्षणाबाबत हरकती नोंदवल्या. काय आहे हे सर्वेक्षण बघुयात.

मुंबई-कोकण

मुंबईसह कोकणात लोकसभेच्या एकूण १२ जागा असून सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार भाजपा शिवसेना आघाडीला सर्वाधिक दहा तर काँग्रेस-राष्ट्रवादीला दोन जागा मिळण्याच अंदाज आहे. रायगड आणि भिवंडी या दोनच मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज आहे. मुंबईत सर्वच जागा शिवसेना-भाजपा युती जिंकेल असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुंबई-कोकणात शिवसेनेला सात तर भाजपाला तीन जागा मिळू शकतात.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण १२ जागा आहेत. शिवसेना-भाजपा युतीला आठ, राष्ट्रवादीला तीन आणि स्वाभिमान एका जागेवर जिंकण्याची शक्यता आहे. बारामती, माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील असे सी-व्होटरने म्हटले आहे. हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो. अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्यासाठी मावळची लढाई खडतर ठरणार आहे. या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला चार आणि शिवसेनेला चार जागा मिळण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात सहा पैकी पाच जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज आहे. अपवाद फक्त नंदुरबारच्या जागेचा. इथे काँग्रेसला विजय मिळण्याची शक्यता आहे.

मराठवाडा

मराठवाडयात लोकसभेच्या आठ जागांपैकी पाच शिवसेना-भाजपाला तर तीन जागा काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळू शकतात. हिंगोली, नांदेडमध्ये काँग्रेस तर परभणीत राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकू शकतो. जालना,औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर येथे शिवसेना-भाजपा युतीचा विजय होण्याचा अंदाज आहे.

विदर्भ

विदर्भातही अन्य भागांसारखीच स्थिती आहे. इथे १० पैकी नऊ लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपाच्या विजयाची शक्यता आहे. विदर्भात भाजपाला सहा तर शिवसेनेला तीन जागा मिळू शकतात. अपवाद फक्त रामटेकच्या जागेचा. रामटेकमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊ शकतो.

एकूण राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी ३७ ठिकाणी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार निवडून येतील फक्त ११ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीला विजय मिळेल असे सी-व्होटरच्या सर्वेक्षणाच अंदाज आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!