कोण कोण आहेत काँग्रेसचे स्टार प्रचारक जाणून घ्या

काँग्रेसने आज महाराष्ट्रातील ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर विश्वास दाखवत काँग्रेसने त्यांना महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांच्या यादीत घेतले आहे . राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यांतर राधाकृष्ण विखे-पाटील अडचणीत आले होते. मात्र स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव घेऊन काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या यादीनुसार प्रियांका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी त्या महाराष्ट्रात प्रचार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे . काँग्रेस स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियांका गांधी, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, विलास मुत्तेमवार, राजीव सातव, मिलिंद देवरा, संजय निरुपम, नगमा, हर्षवर्धन पाटील, कुमार केतकर, कृपाशंकर सिंह, शिवराज पाटील, नितीन राऊत, वसंत पुरके, चंद्रकांत हंडोरे, भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, नसीम खान, मोहम्मद अझरुद्दीन, मुझफ्फर हुसेन, विश्वजीत कदम, सचिन सावंत, अमर राजूरकर, हरिभाऊ राठोड आणि अमिता चव्हाण यांचा समावेश आहे.