‘मी ब्राह्मण, चौकीदार शब्द का लावू?’ मी आदेश देईन ते काम करणं हे चौकीदाराचं कर्तव्य : सुब्रह्मण्यम स्वामी

काँग्रेसच्या ‘चौकीदार ही चोर है’ या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप नेत्यांनी ट्विटवरून नावामागे ‘चौकीदार’ हे नाव लिहायला सुरूवात केली. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह प्रमुख नेत्यांनी त्यांच्या नावामागे चौकीदार असं लिहिलं. त्यावरून आता भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ‘मी ब्राह्मण आहे. नावामागे चौकीदार शब्द का लावू?’ असा सवाल स्वामी यांनी केल्यानं आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. शनिवारी त्याबाबची एक क्लिप देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ‘मी ब्राह्मण आहे, नावामागे चौकीदार शब्द का लावू? मी आदेश देईन ते काम करणं हे चौकीदाराचं कर्तव्य असल्याचंं’ विधान सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलं आहे. त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.