News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या …

1. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, ‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पण त्यांचा हा व्हिडीओ बघता क्षणी बनावट वाटतो.
2. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्ते आणि समर्थकांची तुफान गर्दी…
3. लोकसभा: पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिल रोजी होणार मतदान, २३ मे रोजी निकाल
4. मुंबईः मराठा समाजाला आरक्षण देणारा निर्णय राज्य सरकार, राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या अहवालासह राष्ट्रपतींकडे पाठवत नाहीत आणि राष्ट्रपती या समाजाचा आरक्षणाच्या अनुसूचीमध्ये समावेश करत नाही, तोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होऊच शकत नाहीः मराठा विरोधक याचिकादारांतर्फे मुंबई हायकोर्टात युक्तिवाद
5. चंद्रपूरः महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करताना सोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. नानाजी शामकुळे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी
6. बीड: भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला
7. बीड: राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित
8. नागपूर: नितीन गडकरी आणि कृपाल तुमाने यांनी उमेदवारी अर्ज भरले, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित
9. उस्मानाबादचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी रॅली काढून उमेदवारी अर्ज केला दाखल
10. लोकसभा निवडणूक: सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, नांदेडमधून अशोक चव्हाण, नागपूरमधून नितीन गडकरी, नाना पटोले यांचे उमेदवारी अर्ज दाखल
11. माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांनी नातवासह पुन्हा काँग्रेसमध्ये केला प्रवेश. सकाळी राहुल गांधींची भेट घेतली.
12. यवतमाळ – भावना गवळी यांनी यावेळी सलग पाचव्यांदा खासदार होण्यासाठी सोमवारी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केला.
13. कार्ती चिदंबरम यांनी शिवगंगा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
14. प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मथुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ही त्यांची शेवटची निवडणूक असेल.
15. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल याने मंड्यामधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
16.पालघर लोकसभा निवडणुकी साठी भाजपचे खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविणार
17. भंडारा : भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी भंडारा-गोदिंया मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल केला. भाजपात बंडखोरीची शक्यता.
18. काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा नितीन राऊत फार्म भरण्याची तयारीत, सुनील केदार, राजेंद्र मुळक, प्रफुल गुडधे परत आले.
19. जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी आघाडीतील कुठल्या पक्षाकडे द्यायची याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
20. औरंगाबाद : एमआयएमचा औरंगाबाद लोकसभेसाठीचा उमेदवार आज रात्री 8 वाजता घोषित होणार; सकाळी हैदराबाद येथे झालेल्या बैठकीत आमदार जलील यांच्या नावाची चर्चा.
21. सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी भरला उमेदवारी अर्ज.
22. सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला.
23. यवतमाळ : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी सोमवारी काँग्रेस चे उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला
24. मोदींना शिट्टी आणि टोपी देतो त्यांनी चौकीदाराच बनावे : एमआयएमचे नेते अक्रबुद्दीन ओवेसी
25. यवतमाळ-वाशिमवरून भावना गवळी यांचा लोकसभेसाठी पाचव्यांदा उमेदवारी दाखल, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांची उपस्थिती.