भाजपच्या सहाव्या यादीत भंडारा, गोंदियाचा निकाल

भाजपकडून लोकसभा उमेदवारीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्याता आली आहे. भाजपकडून भंडारा-गोंदियामध्ये नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपच्या या सहाव्या यादीमध्ये भंडारा-गोंदियाचा सस्पेंस संपला असला तरी तर माढा आणि ईशान्य मुंबई या जागांवर अद्याप तिढा कायम आहे.