Video : अगोदर बटिक कोण झाले हे अजीत पवारांनी सांगावे, “बि टीम”ची चर्चा नंतर करु : प्रकाश आंबेडकर

आधी बटिक कोण झालं हे सांगितले पाहिजे नंतर “बीटीम”ची चर्चा होईल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लातूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.
कालच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी वंचित बहूजन आघाडीचे जनक प्रकाश आंबेडकर हे भाजपाची “बि टीम” म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, अगोदर बटिक कोण झाले ? हे त्यांनी सांगितले पाहिजे.
मतदारापैकी ५०% मतदार मतदार हा आता आमच्याकडे आहे कोणीही कितीही टीका केली तरी आम्ही प्रत्यूत्तर देणार नाही. मतदारच त्यांना प्रत्यूत्तर देतील. विरोधकांनी आमच्यावर जोरदार टिका करावी यामुळे आमच्या मतांमध्ये १-२% नी वाढ होईल असेही ते म्हणाले.
आज बहूजन वंचीत आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर लातूरमध्ये उमेदवार राम गारकर यांच्या प्रचार व कार्यकर्त्याच्या बैठकी निमित्ताने लातूरला आले होते. प्रकाश आंबेडकर आज आणि उद्या सोलापूरमध्ये उमेदवारी दाखल करण्याच्या उद्देशाने व्यापक बैठक घेत आहेत . सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर हे जातीय राजकारण करतायत असं म्हंटले होते त्यावर प्रतिक्रिया देताना आता प्रतिक्रिया देणार नाही मात्र सामना रंगेल असं आंबेडकरांनी म्हंटल आहे !